मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

परभणीत भीषण परिस्थितीची दाहकता दाखवणारा VIDEO आला समोर, गरोदर महिलेला थर्माकोल तराफ्यावरुन करावा लागला प्रवास

परभणीत भीषण परिस्थितीची दाहकता दाखवणारा VIDEO आला समोर, गरोदर महिलेला थर्माकोल तराफ्यावरुन करावा लागला प्रवास

pregnant woman travel on thermocol raft shocking video: परभणीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

pregnant woman travel on thermocol raft shocking video: परभणीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

pregnant woman travel on thermocol raft shocking video: परभणीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

परभणी, 9 सप्टेंबर : कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, परभणी जिल्ह्यात (Parbhani) अद्यापही पूरस्थिती जैसे थे असल्याचं दिसत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) आलेल्या पुरात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दिसत आहे की, एका गर्भवती महिलेला चक्का थर्माकोल तराफ्यावरुन रुग्णालयात नेलं जात (Pregnant woman travel on thermocol raft) आहे.

परभणी जिल्ह्यातील दुधना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. टाकळी नीलवर्ण या गावातील गरोदर महिलेला थर्माकोलपासून बनवण्यात आलेल्या ताराफ्यावर झोपवून नेतानाचा धक्कादायक व्हिडीओ, न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे लोअर दुधना या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

परिणामस्वरूप दुधना नदीला पूर आला आणि त्यामुळे मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण या गावाचा जगाशी संपर्क तुटला होता. त्या परिस्थितीमध्ये गावातील गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला रुग्णालयात नेणे आवश्यक होते, परंतु पुलावरून पाणी वाहत असल्याने तो मार्गही बंद होता. परिणामी गावातील तरुणांच्या मदतीने, या महिलेला थर्माकोलचा तराफा तयार करुन नदी पार करावी लागली. त्यानंतर संबंधित महिलेची, मानवतच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डिलवरी झाले असून, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बाळ आणि आई दोघेही सुखरूप

मुसळधार पावसात बैलजोडी गेली वाहून, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र होत असलेल्या या पावसामुळे, नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्या समोर आलंय. दोन दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील कुपटा या गावात बैलजोडी पाण्यामध्ये वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.

First published:

Tags: Parbhani, Rain