मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Rain : राज्यातील या भागात पुढचे 3-4 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याने काय म्हटलं?

Maharashtra Rain : राज्यातील या भागात पुढचे 3-4 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याने काय म्हटलं?

जळगाव जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत.

जळगाव जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत.

जळगाव जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातले. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. यानंतर नद्या, नाले ओसांडून वाहत आहेत. पर्यटकही या पावसाचा आनंद घेत आहेत. यातच आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान खात्याने काय म्हटलं -

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली.

खान्देशात मुसळधार -

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. काल जिल्ह्यातल्या 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पावसानं कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत, तर सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे.

हेही वाचा - Monsoon Update : मान्सून परतीच्या पावसाची चाहूल, ‘या’ दिवसापासून मान्सून परतीचा प्रवास करणार

दरम्यान, वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून, उद्यापर्यंत (ता. 21) राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि कच्छच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. यातच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

First published:

Tags: Maharashtra rain updates, Rain flood