या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम, 5 जुने वाडे कोसळले तर गावांना सतर्कतेचा इशारा

जुन्या नाशिकमध्ये ही दुर्घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नाव दरवाजा येथील हे वाडे होते. हे वाडे खूप जुने असल्यामुळे ते जीर्न झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 08:28 AM IST

या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम, 5 जुने वाडे कोसळले तर गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक, 06 ऑगस्ट : नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना झाली आहे. 5 जुने वाडे कोसळले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रला झोडपून काढलं आहे. यामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर नाशिकमध्ये मोठी दुर्घटना झाली आहे.

जुन्या नाशिकमध्ये ही दुर्घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नाव दरवाजा येथील हे वाडे होते. हे वाडे खूप जुने असल्यामुळे ते जीर्न झाले होते. त्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाडे कोसळले. सुदैवाने वाड्यांमध्ये कोणीही राहत नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारे बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे.

नाशिकच्या गोदावरी नदिला आलेला पुर आता हळू हळू ओसरायला लागला आहे. गंगापुर धरणातून कमी झालेला पाण्याचा विसर्ग आणि शहरातही पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे आता गोदाकाठ वासियाचं जीवन पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात पावसाची संततधार सुरूच आहे. पुणे शहरातल्या औंध भागातील बरचसे भाग अद्याप जलमयचं आहेत. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. पुण्यातील बाणेर येथील साईदत्त रेसिडन्सीमध्ये अडकलेल्या 48 रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातील 107 बांधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही पाणीच पाणी झालं आहे. तर पावसामुळे रात्रीपासूनच राष्ट्रीय महामार्गही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पाहता जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading...

सलग तिसऱ्या दिवशी चिपळूणला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील वशिष्ठी नदीच्या पुलावरून वाहतूकही बंद करण्यात आलीये तर चिपळूण कराड मार्गही ठप्प झाला आहे.

मनमाडच्या हरणबारी धरणातून 18 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे असल्यामुळे मालेगावच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोसम नदीला पूर आला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने चांगलच झोडपलं आहे. काल सकाळपासून महाडमध्ये सावित्री आणि गांधारी नदीने पात्र ओलांडत महाड शहराच्या अनेक भागात पुराच्या पाण्याने प्रवेश केला.

VIRAL VIDEO: दुकानात शिरलेल्या पाण्यातच मालकाने घेतला पोहण्याचा आनंद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...