मुंबईतल्या पावसाचा हजारो प्रवाशांना फटका, रुळावर मारला ठिय्या

गोदान, महानगरी, पुष्पक पाटलीपुत्र एक्सप्रेस अनेक तासांपासून थांबविण्यात आल्या असुन या गाड्यांमधील प्रवासी संतप्त झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 07:32 PM IST

मुंबईतल्या पावसाचा हजारो प्रवाशांना फटका, रुळावर मारला ठिय्या

इम्तियाज अहमद, भुसावळ 2 जुलै : मुंबई झालेल्या जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला असुन रेल्वेचे कोलमडले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे मात्र हाल होत असून अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. मोठं जक्शन असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकावर गोदान, महानगरी, पुष्पक पाटलीपुत्र  एक्सप्रेस अनेक तासांपासून थांबविण्यात आल्या असुन या गाड्यांमधील प्रवासी संतप्त झाले आहे.

अनेक तासांपासून गाड्या थांबल्या आहेत. मात्र प्रवाशांना काहीही माहिती देण्यात येत नाहीये. नेमकी मुंबईकडे कुठली गाडी सोडणार याबाबत काहीट कळत नसल्याने प्रवाशांनी भुसावळ स्टेशनवर गोंधळ घातला. प्रत्येक गाडीतील प्रवासी पहिले आमची गाडी सुटली पाहिजे अशी घोषणा देत रेल्वे रुळावर येऊन बसले. एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही असाही पवित्रा प्रवाशांनी घेतल्याने स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तब्बल दोन तासाने रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी घटनस्थळी दाखल होवुन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाशांचा रोष पाहता रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने घटना स्थळावरून काढता पाय घेतला. अखेर रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून लाईवरून प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी बाजूला केले. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत महानगरी एक्सप्रेस मनमाड कडे रवाना करण्यात आली.

मुंबईत 45 वर्षानंतर झाला तुफान पाऊस, पाहा आजच्या 'तुंबई'चे 45 PHOTOS

धोका अजुन टळला नाही

Loading...

शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अख्खी मुंबई आता पाण्यात गेली असं म्हणायला हरकत नाही. आजही पावसामुळे मुंबई, नवी मुंबईसह पुण्यातही पावसाने तुफान बॅटिंग केली. दुपारनंतर पाऊस जरा ओसरला असला तरी पुढच्या 48 तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

जोरदार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे तर अनेक ठिकाणी झाडं किंवा भिंत कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अवघ्या 12 तासांत महाराष्ट्रात 29 जणांचा मृत्यू झाला. त्यात जागोजागी वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशात हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.

VIDEO : कार चालकांनो पाहा 'हा' व्हिडीओ, सावध राहा तुमचाही जाऊ शकतो जीव

पुढच्या 48 तासामध्ये मुंबईसह अनेक उपनगरांत त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे जीवितहानी वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे समुद्रावर किंवा कोणत्याही टेकड्यांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...