कोल्हापूरसह चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजरी, पुढील 4 तास आणखी कोसळणार

कोल्हापूरसह चंद्रपुरात मुसळधार पावसाची हजरी, पुढील 4 तास आणखी कोसळणार

या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू कलिंगड पिकांना मोठा फटका बसला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 5 एप्रिल : कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात आजही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह जिल्ह्यात पाऊस कोसळला. सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू कलिंगड पिकांना मोठा फटका बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, नेसरी, आजरा परिसरात जोरदार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. परिणामी विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. तसंच अनेक गावांमध्ये वृक्ष उन्मळून पडले. केरळ तामिळनाडूप्रमाणे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं.

दुसरीकडे चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात प्रचंड उकाडा होता. मागील काही वेळापासून विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मात्र या पावसामुळे बंदोबस्त करण्यासाठी विविध चौकात असलेल्या अत्यावश्यक सेवा कर्मचारीवर्गाची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाल्याचं पाहायला मिळालं.

सांगली-कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाचा इशारा

कोल्हापूर सांगली जिल्हात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेन अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.

मुसळधार पावसाची कालही हजेरी

सांगली आणि कोल्हापूरमध्ये कालही (शनिवारी)सांगली मध्ये अचानक अवकाळी पाऊस झाला. भर उन्हाच्या कडाक्यात हा पाऊस बरसला. गेले चार दिवस कडक ऊन सांगलीमध्ये पडत होते. त्यानंतर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाच्या हजेरीमुळे गारवा अनुभवता आला. मात्र पिकांना फटका बसल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

First published: April 5, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या