News18 Lokmat

कोल्हापूरमध्ये पावसामुळे अंबाबाई मंदिर परिसरात पाणीच पाणी

कोल्हापूर शहराला आज संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. दुपारी तीन वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे आणि याच पावसात नवरात्रीनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2017 09:57 PM IST

कोल्हापूरमध्ये पावसामुळे अंबाबाई मंदिर परिसरात पाणीच पाणी

कोल्हापूर, 24 सप्टेंबर : कोल्हापूर शहराला आज संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. दुपारी तीन वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे आणि याच पावसात नवरात्रीनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंदिर परिसरामध्ये पाणी साचले होते, आणि त्याच पाण्यातून वाट काढत आज भाविकांनी शारदीय नवरात्रोत्सवात देवीच दर्शन घेतलं.

आज रविवार असल्याने भाविकांनी मोठी गर्दी कोल्हापूरमध्ये केली होती , पण पावसाने या सगळ्या भाविकांना  अडचणीत आणलं . रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांच नद्यांच्या आणि तलावांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातही मुसळधार पावसाने कोल्हापूर ला झोडपून काढलं होतं , त्यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 09:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...