Elec-widget

गडचिरोलीत मुसळधार, शंभर गावांसह भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला

गडचिरोलीत मुसळधार, शंभर गावांसह भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला

गेल्या 24 तासात एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

  • Share this:

महेश तिवारी, 13 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला असून शंभर गावांसह  भामरागड तालुक्याचा संपर्क पुन्हा एकदा तुटलाय. पर्लकोटा नदीवरील मोठा पुलं पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महीनाभरात तब्बल तिसऱ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अतिवृष्टी होऊन जिल्हयात अनेक मार्ग बंद पडलेत.  गेल्या 24 तासात एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

VIDEO : 'आम्ही घरात राहायला आलोय, नुकसान भरपाई कशाच्या आधारावर देणार?'

या पावसाने गडचिरोली शहरात पुरपरिस्थिती तयार होऊन नगरपरिषद, पेट्रोल पंपासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर कन्नमवार वॉर्डामध्ये रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहरालगत असलेल्या गुरवळा नाल्यावर पुराचं पाणी आल्याने पुराच्या पाण्यात टाटा सुमो वाहन अडकली होती. चारही बाजुने पाण्याने वेढलेल्या टाटा सुमोमधील बारा प्रवाशांची सुखरुप सुटक करण्यात प्रशासनाला यश आलं.

अटीवृष्टीचा फटका डॉ. अभय बंग यांच वास्तव्य असलेल्या शोधग्राम येथील सर्चच्या वसाहतीलाही बसलाय. सर्चच्या वसाहतीतील अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने या भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान सावरगाव आणि सर्च दरम्यान असलेल्या रस्त्यावरही मोठया प्रमाणात पाणी साचल्याने या भागातली वाहतुकही पुर्णपणे ठप्प झालीय.

पुण्यात गोळीबार, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू

Loading...

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. 6 ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली. 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात जिल्हाभरात सरासरी  55.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला.

पुरग्रस्तांसाठी सरसावले हजारो हात, 8 दिवसांमध्ये तिजोरीत जमा झाली 'एवढी' रक्कम

तर धानोरा तालुक्यात 89, आरमोरी 99 तर कुरखेडा तालुक्यात 90 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या सती नदीला पूर आला आहे. सती नदीवर कढोली जवळ असलेल्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कढोली-वैरागड मार्ग आज सकाळ पासून बंद झाला आहे. आता हे मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...