मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, 4-5 दिवसांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

गणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, 4-5 दिवसांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

आज (19 ऑगस्टला) उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हे क्षेत्र पुढच्या 24 तासांत अधिक तीव्र होण्याची व पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 19, ऑगस्ट : राज्यात गेल्या दोन आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर, आज (19 ऑगस्टला) उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हे क्षेत्र पुढच्या 24 तासांत अधिक तीव्र होण्याची व पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे. एवढेच नाही तर गणरायाच्या आगमना दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूरसह काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर तलाव भरलं

मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणा-या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव 18 ऑगस्ट रोजी रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हे तलाव 26 जुलै 2019 रोजी भरुन वाहू लागले होते. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

First published:

Tags: Mumbai rain