मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Rain in Maharashtra : महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं?

Rain in Maharashtra : महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं?

राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात हवानान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे.

राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात हवानान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे.

राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात हवानान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 सप्टेंबर : राज्यात मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरू केले आहे. सध्या मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यात आता राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात हवानान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे.

हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं?

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - VIDEO : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; रूळ जलमय, चाकमान्यांना 'लोकलविलबां'चा फटका

दरम्यान, काल (दि. 07) राज्यात कोल्हापूर, सातारा, पुण्यासह विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. दरम्यान गणेश विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाले असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

भिवंडीत मुसळधार -

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर सखल भागात पाणी साचले आणि नंतर नाले, गटारे चॉक झाले आहेत. यासोबतच भिवंडीतही मुसळधार पाऊस झाला. यामुळे अवघ्या दीड ते दोन तासात 100 पेक्षा जास्त दुकानात पाणी साचले आहे.

First published:

Tags: IMD FORECAST, Maharashtra rain updates, Mumbai rain