मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gadchiroli Road : ऐन पावसाळ्यात सुरू केलं रस्ता दुरुस्तीचं काम; होता तोही रस्ता गेला वाहून, 35 गावांचा संपर्क तुटला

Gadchiroli Road : ऐन पावसाळ्यात सुरू केलं रस्ता दुरुस्तीचं काम; होता तोही रस्ता गेला वाहून, 35 गावांचा संपर्क तुटला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

येथील कंत्राटदाराने कुमरगुडा रस्त्यावर पावसाळ्यात खोदकाम केले. खोदकामामुळे रस्ता बंद झाला होता.

    गडचिरोली : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही भामरागड (Bhamragad) तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका येथील नागरिकांना बसल्याचे समोर आले आहे. (Rain in Gadchiroli) नेमकं काय घडलं -  येथील कंत्राटदाराने कुमरगुडा रस्त्यावर पावसाळ्यात खोदकाम केले. खोदकामामुळे रस्ता बंद झाला होता. रस्त्यावर खोदकाम केल्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. हा कच्चा रस्ता दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे तब्बल 35 गावांचा संपर्क तुटला आहे. ऐन पावसाळ्यात कच्चा रस्ताही वाहून गेल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भामरागड तालुक्यातील जवळपास 35 गावांच्या वाहतूक या भामरागड-नारायणपूर राष्ट्रीय महामार्गावरून चालते. मात्र, हा कच्चा रस्ता दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. भामरागड-नारायणपूर छत्तीसगढ-महाराष्ट्र मालेगाव महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्रवासासाठी मोठी अडचण होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात चार महिन्यांत नऊ वेळा भामरागड तालुक्याच्या संपर्क पूर्णपणे जिल्ह्यापासून तुटला होता. प्रत्येक वर्षी सर्वात आधी भामरागड तालुक्यात पावसाळ्यात तालुक्याचा संपर्क तुटत असतो. यावर्षीही तसेच झाले. आता भामरागडच्या तहसीलदार व मुख्याधिकारी हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून रस्ता सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, नागरिकांना याचा फटका बसला आहे. हेही वाचा - Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका टळणार पाणी पातळीत घट, पाऊस थांबला पुण्यात तरुणीसोबत दुर्दैवी घटना - मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेली आहे. ही घटना मावळ-कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात घडली. साक्षी सतीश वंजारे, असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरातून ती मैत्रिणी सोबत फिरायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना पाय घसरून ही तरुणी पडली आणि इंद्रायणी नदी पात्रात वाहून गेली
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gadchiroli, Rain

    पुढील बातम्या