नागपूरसह संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या लाटेत होरपळला..जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6

नागपूरसह संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या लाटेत होरपळला..जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6

जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6 शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यातही उष्णतेची लाट तीव्र झाल्याने कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, (प्रतिनीधी)

नागपूर,  27 एप्रिल- नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. निम्म्यापेक्षा जास्त विदर्भात 45 अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. मागील सहा दिवसांत तापमान 39 अंशांवरून 45 अंशांपेक्षा जास्त झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थीतीमुळे विदर्भ चांगलाच होरपळला आहे. जगातील सर्वात उष्ण अशा पंधरा शहरांपैकी सहा शहरे विदर्भातील आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 46.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6 शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यातही उष्णतेची लाट तीव्र झाल्याने कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला आहे.

आठ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार

महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांत येत्या आठ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आण गुजरात आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या जास्त दाबाचा पट्टा आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील तापमानामध्ये सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

– एस. एल. साहू, डायरेक्टर जनरल, प्रादेशिक हवामान खाते.

जगातील सर्वात उष्ण शहरात विदर्भातील सहा शहरे...

1) अकोला – 2

2) ब्रम्हपुरी – 3

3) वर्धा – 5

4) चंद्रपूर - 6

5) अमरावती - 7

6) नागपूर - 8

ताडोबातील वन तलावात 9 पक्षांचा मृत्यू

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या झळा या मनुष्यांसोबतच पशु पक्षांनाही बसताहेत. ताडोबातील वन तलावात उन्हामुळे 9 पक्षांचा मृत्यू झालाय तर नागपुरच्या अंबाझरी तलावातील हजारो मासेही प्रदुषणासोबतच वाढत्या तापमानामुळे मृत्यूमुखी पडले आहे. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याने उष्णता वाढली.)

- कौस्तव चँटर्जी, पर्यावरण वादी.

'विदर्भ तापत असतांना त्यात उष्णतेत आणखी वाढ करण्यासाठी सरकारच हातभार लावत असल्याचा आरोप पर्यावरण वाद्यांनी केला आहे. लहानमोठे असे 250 कोळशावर आधारीत वीज निर्मिती प्रकल्प असणाऱ्या विदर्भात नागपुरच्या विदर्भात आणखी दोन औष्णिक वीज केंद्र राज्य सरकारने मंजूर केले आहे.'

- सुधीर पालीवार, विदर्भ एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट

एकीकडे ही सर्व परिस्थिती असतांना तापमान नियंत्रित करण्यासाठी काहीही प्रयत्न होतांना दिसत नाहीये. अशीच परिस्थीती राहिली तर मनुष्यांसोबतच पशु पक्षांनाही याच्या छळा पोहचतील. नागपूर महानगर पालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात अशे शेड तयार करून उन्हापासून बचाव करण्याच प्रयत्न सुरु केला आहे. पण पर्यावरण रक्षण आणि उष्णतामान नियंत्रित ठेवण्यासाठी शास्वत प्रयत्नांची गरज आहे.

​शीतकक्ष अद्याप सुरू नाहीत...

संपूर्ण विदर्भात या उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे, आवाहन आरोग्य विभागाचे विभागीय संचालक संजय जैस्वाल यांनी केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 47 रुग्ण उष्णतेमुळे विविध रुग्णालयात दाखल असतांना देखील अद्याप शासकीय रुग्णालयांमध्ये शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात तापमानातील ही वाढ मे महिन्यातील उष्णतेची चिंता वाढवत आहे. विदर्भातील आजच्या तापमानातील अकोला हे सर्वात जास्त 'हॉट' राहिले. गेल्या आठ दिवसांपासून तापमानामध्ये होत असलेला चढ-उतार आणि मधातच दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे अकोल्यातील उष्णतेची लाट कमी झाली होती. तर गेल्या तीन दिवसांपासून अकोल्याचे तापमान 41 ते 43 अंशाच्या जवळपास राहिले. हळूहळू सूर्य आग ओकत आहे. अकोल्याचे आजचे तापमान 46.3 अंश होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील या तापमानाने विदर्भाचा उष्णतेच्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याआधीच पहिला क्रमांक लावला. या कडक उन्हामुळे आज शहरात नागरिकांना दैनंदिन कामजात कमालीचा त्रास सहन करावा लागला. अंगाला चटके लागणारे हे उन अकोलेकरांना आज थक्क करून गेले. उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेय, पंधरा रुमलाचा वापर करून आवाहन करण्याचा प्रयत्न करत होते.

अंगाची लाही लाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे विदर्भात उष्माघाताचे 47 रुग्ण विविध दवाखान्यात उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या वर्षी नागपुरात 364 रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत 47 रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

उन्हापासून कसे करावे रक्षण...

काय करावे..

- भरपूर पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.

- फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा.

- उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

- पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.

- कुलर, ओलसर ताट्या, पंखा यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

काय करू नये...

- उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.

- पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

- भडक रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

- खुप प्रथिनयुक्त अथवा शिळे अन्न खाऊ नका.

पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

First published: April 27, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading