वर्धा सर्वाधिक हॉट..विदर्भ-मराठवड्यात पुढील 3 दिवस उन्हाचा कहर!

वर्धा सर्वाधिक हॉट..विदर्भ-मराठवड्यात पुढील 3 दिवस उन्हाचा कहर!

विदर्भात तापमानाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाही. विदर्भात शनिवारी बहुतांश ठिकाणी पारा 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा इथे आज सर्वाधिक अर्थात 45.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

  • Share this:

नागपूर, 1 जून- विदर्भात तापमानाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाही. विदर्भात शनिवारी बहुतांश ठिकाणी पारा 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा इथे आज सर्वाधिक अर्थात 45.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यातच विदर्भ आणि मराठवाड्यात आता उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळावं, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्याच आठवड्यात अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 46.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6 शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यातही उष्णतेची लाट तीव्र झाल्याने कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. चंद्रपूरमध्ये उष्णतेचा कहर आहे. तापमान 48 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. नागपुरातही पारा 47 अंशांच्या पुढे गेला आहे. गपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. निम्म्यापेक्षा जास्त विदर्भात 46 अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. मागील आठ दिवसांत तापमान 39 अंशांवरून 45 अंशांपेक्षा जास्त झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे विदर्भ चांगलाच होरपळला आहे. जगातील सर्वात उष्ण अशा पंधरा शहरांपैकी सहा शहरे विदर्भातील आहे.

जून महिना सुरु झाला असला तरी उन्हाचा कडाका काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दररोज तापमान वाढतच आहे. नागपुरात गेल्या आठवड्यात तापमान तब्बल 47.5 डिग्री सेल्सिअसवर गेलं होतं. गेल्या 20 वर्षातलं हे सर्वात जास्त तापमान आहे. यापुर्वी सर्वात जास्त 47.9 डिग्री एवढं तापमान नोंदविलं गेलं होतं. ग्लोबल वार्मिंग आणि ग्रीन हाऊस गॅसेस मुळे तापमान वाढत आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

दरम्यान, विदर्भात उन्हाळ्यात तापमान जास्तच असते. दरवर्षी त्यात वाढ होतेय. सकाळी 8 पासूनच उन्हाचा कडाका जाणवायला लागतो. रात्री 12 नंतरही हवेत उष्णता कायम राहते. पहाटे पहाटे वातावरण थोडं थंड होतं मात्र सूर्योदय होताच वातावरण तापायला लगातं. वातावरण एवढं गरम असतं की एसीही काम करत नाहीत. शहरात उष्माघाताचं प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

विदर्भात या शहरात असा होता तापमानाचा पारा

अकोला- 44.2

अमरावती-44.8

बुलडाणा-42.2

ब्रम्हपुरी-41.9

चंद्रपूर- 42.6

गडचिरोली-42.2

गोंदिया-40.4

नागपूर-43.08

वर्धा- 45.5

वाशिम- 43.0

यवतमाळ-42.5

मोदींचा हाच तो VIDEO, ज्यात पटेलांवर कारवाईचे दिले होते संकेत

First published: June 1, 2019, 7:21 PM IST
Tags: heat Wave

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading