Home /News /maharashtra /

Heat wave Maharashtra : राज्यात उष्णतेचा कहर काही थांबेना, मागच्या 24 तासात दोघांचा उष्माघाताने मृत्यू

Heat wave Maharashtra : राज्यात उष्णतेचा कहर काही थांबेना, मागच्या 24 तासात दोघांचा उष्माघाताने मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) अहेरी तालुक्यात 75 वर्षांच्या वृद्ध महिलेचा उष्माघाताने (heatwave death) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  गडचिरोली, 1 जून : गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) अहेरी तालुक्यात 75 वर्षांच्या वृद्ध महिलेचा उष्माघाताने (heatwave death) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लचुमबाई बोंदा कोडापे, रा.वट्रा (बु) ता. अहेरी असे मृत वृद्धेचे नाव आहे. दरम्यान कालपासून राज्यात दुसरी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात काल एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. (Jalgaon heatwave death)

  राज्यात उन्हाचा पारा (Maharashtra Temperature) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने 45 चा आकडा पार केला होता. सर्वात जास्त तापमान हे विदर्भात (Vidarbha) नोंदवण्यात आले. लचुमबाई कोडापे या श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना तलाठ्याकडून जिवंत असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबूक घेऊन तहसील कार्यालयात ओळख परेडसाठी त्या गेल्या होत्या.

  हे ही वाचा : 'या' सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त पैस खर्च करावे लागणार; किती खर्च वाढणार?

  दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात काल दिवसभर उन्हाचा तडाखा मोठा होता. कोडापे या काल टॅक्सीमधून २५ किलोमीटर अंतरावर पार करत तालुक्याला अहेरी येथे गेल्या होत्या. तेथून त्या आल्या त्यांना थोडा त्रास जाणवत असल्याचे स्थानिक सांगत होते. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज काही गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना विचारणा केली असता त्यांनी आपण दोन दिवसांपासून पुण्यात प्रशिक्षणासाठी असून, आपणास या घटनेची कल्पना नसल्याचे सांगितले.

  जळगावात एकाचा उष्माघाताने मृत्यू

  बहिणीकडे आलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू (Heatstroke) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली. किशोर ज्योतिराम खलपे असे 37 वर्षीय मृताचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील रहिवासी होते. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  हे ही वाचा : Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या दारात; एंट्रीसाठी कधीचा मुहूर्त साधणार

  किशोर यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मृत किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते. गुरुवारी दिवसभर त्यांनी काम केले. यानंतर सायंकाळी सहा वाजता रिक्षा थांब्याजवळ चक्कर येऊन ते कोसळले. यानंतर नातेवाईकांनी लगेचच त्यांना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Gadchiroli, Heat, Jalgaon

  पुढील बातम्या