Home /News /maharashtra /

राज्यात उष्माघाताचा आणखी एक बळी; पाण्याचा घोट घेताच बांधावरच शेतकऱ्याने सोडला जीव

राज्यात उष्माघाताचा आणखी एक बळी; पाण्याचा घोट घेताच बांधावरच शेतकऱ्याने सोडला जीव

लिंबराज सुकाळे हे शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिले, पाणी पित असतानाच उष्माघातामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला.

उस्मानाबाद 01 एप्रिल : राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंमध्येही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. आता उस्मानाबादमध्येही एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. लिंबराज सुकाळे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून ते 50 वर्षांचे होते. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही उस्मानाबादमधील यंदाची पहिलीच घटना आहे (Farmer Dies due to Heatstroke). लिंबराज सुकाळे हे शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिले, पाणी पित असतानाच उष्माघातामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना कळंबमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही घटना कळंब तालुक्यातील हसेगाव येथील आहे. Heatstroke in Maharashtra: राज्यात सूर्याचा प्रकोप; उष्माघाताने आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू उस्मानाबादमध्ये गेल्या 6 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे अनेकांना उष्माघाताच्या (Heatstroke in Maharashtra) समस्या जाणवत आहेत. उष्माघामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना - जळगावमध्ये एका शेतकऱ्याचा उष्णाघाताने मृत्यू झाला होता. जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या 33 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी माळी यांनी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले होते. त्यानंतर भर उन्हात शेतातील काम केलं होतं. शेतातून काम करून घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना - अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात सारकिन्ही येथील एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. समाधान शामराव शिंदे असं मृत पावलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. जळगाव पाठोपाठ राज्यात उष्माघाताचा हा दुसरा बळी होता.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Farmer, Osmanabad

पुढील बातम्या