राज्यात आज अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात आज अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यातली सर्वाधिक तापमानाची नोंद आता अकोल्यात केली गेली आहे. अकोल्यात 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

  • Share this:

31 मार्च : तापमानाचं नवा भिरा आता विदर्भात तयार झालं आहे. कारण राज्यातली सर्वाधिक तापमानाची नोंद आता अकोल्यात केली गेली आहे.

अकोल्यात 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वरचं आहे. असंच सर्वात कमी तापमान काल नगरचं होतं. त्यामुळे तापमानात वेगानं बदल होत असल्याचं दिसतंय.

विदर्भ, मराठवाड्यातल्या बहुतांश शहरांच्या तापमानाची वाटचाल 45 अंश सेल्सिअस तापमानाकडे सुरू आहे. तशीच काहीशी स्थिती खान्देशचीही आहे. मालेगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. इथलं तापमान हे 43 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. विदर्भात तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची तुरळक लाटही राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडेल असा अंदाज आहे.

दुसरीकडे मुंबईत गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेला उकाडा आजही कायम आहे.

राज्याचे तापमान

  • मुंबई - 33
  • नाशिक - 39
  • जळगाव - 42
  • नागपूर - 43
  • औरंगाबाद - 41
  • पुणे - 39
  • रत्नागिरी - 32
  • कोल्हापूर - 36
  • सोलापूर - 40

First published: March 31, 2017, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading