मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ह्रदयद्रावक! भरधाव ट्रकची 4 बैलगाड्यांना धडक, ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू

ह्रदयद्रावक! भरधाव ट्रकची 4 बैलगाड्यांना धडक, ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या  बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे  निघाल्या होत्या.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाल्या होत्या.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाल्या होत्या.

  • Published by:  sachin Salve

मधुकर गलांडे, प्रतिनिधी

इंदापूर, 30 नोव्हेंबर  : पोटासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन धडपडणार्‍या ऊसतोड मजुरांवर काळाने घाला घातला आहे.  बारामती इंदापूर राज्य महामार्गांवर (Baramati Indapur State Highway) भरधाव ट्रकने 4 बैलगाड्यांना जोरात धडक दिल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या  बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे  निघाल्या होत्या.  बेलवाडी जवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रक चालकाने चार बैलगाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये एका ऊसतोड मजूर जागीच ठार झाला. तर एक बैलही मृत्युमुखी पडला आहे. तर चार बैल जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे  बैलगाड्या  महामार्गावरून खाली फेकल्या गेल्या. या अपघातात भाऊराव उत्तम कांबळे या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला आहे. भाऊराव कांबळे हे  बीड जिल्ह्यातील आष्टी इथं राहणारे होते.

महामार्गावरील बेलवाडी ओढ्यावरील पुलावर हा अपघात झाला असून अतिशय वेदनादायी घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

भिवंडीत भीषण अपघात, 1 ठार 5 जखमी

दरम्यान, भिवंडी तालुक्यातील अंबाडी-वसई रोडवरील सावरोली इथं  सुसाट वेगात असलेल्या हायवा डंपरची तब्बल चार  वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार, टेम्पो, बाईक या तीन वाहनाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहे. या  रोडवर रोजच  रेती, खडी भरून हायवा डंपर सुसाट वेगात जात असतात. पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे.

First published: