Home /News /maharashtra /

'ही घटना मनाला वेदनादायी', पंतप्रधान मोदींनी भंडाऱ्यात 10 बाळांच्या मृत्यूमुळे व्यक्त केले दु:ख

'ही घटना मनाला वेदनादायी', पंतप्रधान मोदींनी भंडाऱ्यात 10 बाळांच्या मृत्यूमुळे व्यक्त केले दु:ख

'अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे'

    मुंबई, 09 जानेवारी : महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात आग लागल्यामुळे गुदमरुन 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुख व्यक्त केले आहे. मृत नवजात बाळांच्या कुटुंबीयांचं पंतप्रधानांनी सांत्वन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून भंडाऱ्यातील घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत' अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. तर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी सुद्धा या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेबद्दल शब्दांत दु:ख व्यक्त करणे अशक्य आहे. बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या दुखद संकटाच्या प्रसंगात देव त्यांना शक्ती देवो, अशी भावना अमित शहांनी व्यक्त केली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तर 'भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश दरम्यान,  भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या