लेकाच्या निधनाची बातमी ऐकताच आईनेही सोडला जीव; एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार

लेकाच्या निधनाची बातमी ऐकताच आईनेही सोडला जीव; एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार

मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईने जागेवरच प्राण सोडले.

  • Share this:

लातूर, 28 ऑक्टोबर : आईच्या प्रेमाची तुलना कोणाशीच करता येत नाही. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून मुलांचं पोट भरणाऱ्या आईचे ऋण केव्हाच फेडता येऊ शकत नाही.

त्यातच लातूर येथून एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने जागेवरच प्राण सोडला. पंडित वीरभद्र आर्य विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव चांदीवाले (वय - 59) यांचे सोमवारी सायंकाळी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची आई अनुसया बाईंच्या कामावर पडली. यामुळे त्यांना मोठा आघात झाला. मुलगा या जगातच नाही ही भावनाच त्यांना सहन झाली नाही. व यातच त्यांचा मृत्यू झाला. या दोघांवर लखनगाव येथे मंगळवारी रात्री 11वाजता एकाच सरकणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे

हे ही वाचा-चक्क सिंहाच्या तोंडातून खेचून काढलं; जंगलाचा राजा आणि झेब्रामधील थरारक VIDEO

या घटनेनंतर गावात शोकमय वातावरण झालं आहे. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईने जागेवरच प्राण सोडले. या माऊलीने मुलांना मोठं करत त्यांना मोठं केलं. मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. अशात मुलाने आपल्याआधी डोळे झाकलेले या माऊलीला पाहायल नाही. मुलाचा मृतदेह पाहण्याआधीच तिने आपला जीव सोडला.

Published by: Meenal Gangurde
First published: October 28, 2020, 7:11 PM IST
Tags: two deaths

ताज्या बातम्या