मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अनिल देशमुखांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुखांना कोर्टाकडून दिलासा नाहीच, पुढची सुनावणी 4 डिसेंबरला

अनिल देशमुखांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुखांना कोर्टाकडून दिलासा नाहीच, पुढची सुनावणी 4 डिसेंबरला

ऋषिकेश देशमुख (Rushikesh Deshmukh) यांना ईडीने नोटीस (ED Notice) बजावली आहे. या नोटीसनुसार ऋषिकेश यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीदरम्यान कदाचित त्यांना ईडीकडून अटक (ED arrest) केली जाऊ शकते.

ऋषिकेश देशमुख (Rushikesh Deshmukh) यांना ईडीने नोटीस (ED Notice) बजावली आहे. या नोटीसनुसार ऋषिकेश यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीदरम्यान कदाचित त्यांना ईडीकडून अटक (ED arrest) केली जाऊ शकते.

ऋषिकेश देशमुख (Rushikesh Deshmukh) यांना ईडीने नोटीस (ED Notice) बजावली आहे. या नोटीसनुसार ऋषिकेश यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीदरम्यान कदाचित त्यांना ईडीकडून अटक (ED arrest) केली जाऊ शकते.

मुंबई, 22 नोव्हेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख (Rushikesh यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामिन अर्जावर आज सुनावणी झाली. पण या सुनावणीत ऋषिकेश यांना दिलासा मिळाला नाही. कोर्टाने याबाबतच्या पुढील सुनावणीसठी 4 डिसेंबरची तारीख दिली आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावर आता 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

ऋषिकेश यांना 4 डिसेंबरपर्यंत अप्रत्यक्षरित्या अटकेपासून संरक्षण

ऋषिकेश देशमुख यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार ऋषिकेश यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीदरम्यान कदाचित त्यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते. या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी ऋषिकश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाला आता दुसऱ्यांदा पुढची तारीख मिळाली आहे. आता या जामीन अर्जावर 4 डिसेंबर सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऋषिकेश यांना 4 डिसेंबरपर्यंत अप्रत्यक्षरित्या अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. कारण हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट्य असल्याने देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले तरी त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा : चिघळलेल्या ST संपासाठी पवारांचा पुढाकार, अडीच तासांपासून बैठक गुप्त बैठक

पुढच्या सुनावणीत ईडीचे वकील बाजू मांडणार

दुसरीकडे ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी ईडीने देखील तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडी कोर्टात 4 डिसेंबरला याबाबत आपली भूमिका मांडणार आहे. ऋषिकेश यांच्याविरोधात ईडीकडे नेमके काय ठोस पुरावे आहेत, या बाबतची माहिती ईडीचे वकील 4 डिसेंबरला कोर्टात देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित

ऋषिकेश देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?

ईडीच्या वकिलांनी याआधी कोर्टात काही मुद्दे मांडले होते. त्यामध्ये त्यांनी अनेक दावे केले होते. "अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरु ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. हाच पैसा दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही", अशी माहिती वकिलांनी कोर्टात दिली होती.

"एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्टमध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा", असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Anil deshmukh