अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप झाला होता.

  • Share this:

08  डिसेंबर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती. त्यानंतर त्यांच्या  आमदारकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप झाला होता. तसा आरोप  करून  काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली होती.

यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.व्ही.नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती.तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत मी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं अर्जुन खोतकरांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही ठणकवलं होतं.

त्याप्रमाणे त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. त्यावर आता आज सुनावणी होणार आहे. त्यांची ऐ आमदारकी टिकते की रद्द होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 8, 2017, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading