शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी, 20 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. परंतु, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य सेवकांचेच कोरोना रिपोर्ट मागील पाच दिवसांपासून आले नसल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.
गुहागर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांचे कोरोना चाचणीसाठी घेतलेले स्वॅब रिपोर्ट आज 5 दिवस झाले तरी अहवाल न आल्याने आरोग्य कर्मचारी वर्गातून नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये दोन महिला कर्मचारी व आरोग्य सेवक पुरुष आहे.
15 तारखेनंतर गुहागर तालुक्यातून घेण्यात आलेले इतर स्वॅब यांचे रिपोर्ट आले. मात्र, 15 तारखेला घेतले गेलेले आरोग्य कर्मचारी यांचे स्वॅब रिपोर्ट अद्याप का आले नाही? की रिपोर्ट आलेले असताना सुद्धा ते कर्मचारी वर्गांला मुद्दाम त्रास देण्यासाठी सांगितले जात नाहीत, अशी चर्चा सध्या या गुहागर तालुक्यात सुरू आहे.
काँग्रेस आमदारांचा मुक्काम शाही हॉटेलमध्ये, POHOTOS पाहून व्हाल थक्क
जर आरोग्य कर्मचारी यांचा आरोग्य असं वार्यावर जाणार असेल तर भविष्यात या तालुक्यातील आरोग्य यंत्रणाला मोठी अडचण निर्माण होईल. कारण, आज याच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे तालुका अद्यापही सुस्थितीत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यापासून अफाट मेहनत घेतली आहे आणि असे असताना सुद्धा जर त्यांचे कोरोना चाचणीसाठी घेतलेले स्वॅब गेले पाच दिवस त्याबाबत पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत हे जर प्रशासन सांगत नसले तर खरोखरच या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा आता आरोग्य विभागातील इतर कर्मचारी बोलू लागले आहेत.
नेपाळी पोलिसांचं धक्कादायक कृत्य; भारतीय सीमेवरील 3 जणांवर केला गोळीबार
तरी संबंधित अधिकारी वर्गाने याकडे त्वरित लक्ष देऊन या कर्मचाऱ्यांचे अहवाल जो काही असेल तो जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा यानंतर जर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी असतील, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या 1250 वर
दरम्यान, रत्नागिरीत गेल्या 24 तासांमध्ये प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कोरोनाचे 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण संख्या 1250 वर पोहोचली आहे. घरडा 10, रत्नागिरी 5, कामथे 14, लांजा 6 आणि दापोली 5 या परिसरात असे एकूण 40अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.