राज्यात Lockdown 4.0 अटळ; धार्मिक स्थळं लवकर उघडणार नाहीत, रेड झोनचे नवे नियम

राज्यात Lockdown 4.0 अटळ; धार्मिक स्थळं लवकर उघडणार नाहीत, रेड झोनचे नवे नियम

धार्मिक स्थळं लवकर खुली होण्यासारखी परिस्थिती नाही. हॉट स्पॉटसाठी रेड झोनचे नवीन नियम लागू होतील, असं सांगून रुग्णसंख्या वाढणारा आहे, असा इशाराही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

  • Share this:

नाशिक, 13 मे : चौथ्या लॉकडाऊनला पर्याय नाही. या लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देत निर्बंध कसे कायम ठेवायचे याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्लॅन तयार आहे. तो त्यांनी केंद्राकडे सोपवला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नाशिकमध्ये बोलताना त्यांनी लॉकडाऊन 4.0 टाळणं शक्य नाही असं सांगितलं. आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने आता उलट रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

- आपल्याला कोरोनसोबत जगण्याची तयारी करावीच लागणार

- नव्या लॉकडाऊनचे नियम वेगळे असतील, पण निर्बंध कायम राहणार

- लॉकडाऊन प्रोटोकॉलचं पालन नागरिकांनी करावं.

- मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग पाळणं महत्वाचं

- येत्या दिवसात फक्त हॉट स्पॉट परिसर बंद असतील

- धार्मिक स्थळं लवकर खुली होण्यासारखी परिस्थिती नाही

- वैयक्तिक आणि सामूहिक स्वच्छता पाळणं आवश्यक

- कोरोनारुग्णांच्या डिस्चार्जच्या नवीन गाईडलाईन पाळल्या जाणार आहेत.

- लक्षणं नसतील तर 10 दिवसात, टेस्ट न करता डिस्चार्ज देणार

- 50 पेक्षा जास्त वय नसलेल्या पोलिसांनी कोरोना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरू नये, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात दिवसभरात 1495 रुग्ण नव्याने दाखल झाले. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वांत धक्कादायक आकडा मुंबईतून आला आहे. मुंबईत दिवसभरात 40 मृत्यू नोंदले गेले.

आजपर्यंत राज्यातून 5547 रुग्णांना बरं झाल्याने घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 14,627 जण संस्थात्मक क्वारंटाईनमझ्ये आहेत.

लॉकडाऊनमध्ये अनोखा विवाहसोहळा; कोरोना योद्ध्यांच्या साक्षीने बांधली लग्नगाठ

चिमुकल्याचं मोठं दातृत्व, कपकेक विकून कमावलेले 50 हजार दिले मुंबई पोलिसांना

First published: May 13, 2020, 9:02 PM IST

ताज्या बातम्या