मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शटडाऊन गरजेचं.. Work Form Home वर सहमती, लोकल ट्रेनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

शटडाऊन गरजेचं.. Work Form Home वर सहमती, लोकल ट्रेनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मुंबई,17 मार्च: कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण सध्या कोरोना व्हायरसच्या फेज 2 मध्ये असून फेज 3 मध्ये जाऊ नये, यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले. खासगी क्षेत्रात शटडाऊन गरजेचं आहे. अत्याआवश्यक सेवा वगळून Work Form Home वर जवळपास सर्व कंपन्यानी सहमती दर्शवली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक आणि मुंबईत लोकल, मेट्रो ट्रेन बंद करायच्या की नाही, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली. राजेश टोपे यांनी सांगितलं की, मुंबईत लोकलच्या डब्यात जास्तीतजास्त किती माणसं असावेत, याबाबत काही मार्गदर्शक सुचना देण्यात येण्याबाबत विचार सुरु आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. औषध कंपन्यांनी जगभरात इतर देशांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचीही माहिती दिली आहे. मुंबईत लोकल ट्रेन, मेट्रो, बस सारखी सार्वजनिक वाहतूक काही दिवस बंद करण्याबाबत आज कॅबिनेट यात चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात एक आठवड्यासाठी किंवा काही दिवस बंद करता येईल का, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. हेही वाचा..कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस येथे कार्पोरेट सेक्टरमधील काही उद्योजकांशी चर्चा केली. औषध आणि इतर उद्योग क्षेत्रातील लोक या बैठकीला उपस्थित होते. तसेच औषध बँकिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील नागरिकांशीही आरोग्य मंत्री यांनी चर्चा केली. कार्पोरेट सेक्टर तसेच सार्वाजनिक व्यवहारात अंतर ठेवून काम करणं शक्य नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी काय करता येईल, या उद्देशानं या बैठकीत चर्चा करण्यात आली. जवळपास सगळे वर्क फॉर्म होम करण्यास सहमती दर्शवली आहे. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्याबाबत ही कार्पोरेट कंपन्या सरकारला मदत करतील, असेही टोपे यांनी सांगितले. मास्क सॅनिटाझयर, व्हेन्टीलेटर, आयसोलेटेड वॉर्ड याबाबत ही ह्या कंपन्या मदत करतील. संबंधित फार्मा कंपनी फ्रीमध्ये मेडीसन उपलब्ध ही करून देतील. कार्पोरेट सेक्टरमध्ये 100 टक्के बंद करण्याचे मान्य केले. छोट्या ग्रामीण भागातील उद्योग बंद करू नये, कंत्राट कामगार फटका बसू नये, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. हेही वाचा..बाबासाहेब बघत आहात ना, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांचा रंजन गोगोई यांना विरोध
First published:

पुढील बातम्या