Home /News /maharashtra /

'...म्हणून आरोग्य विभागाच्या ड वर्गाची परीक्षा पुन्हा घेणार', काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

'...म्हणून आरोग्य विभागाच्या ड वर्गाची परीक्षा पुन्हा घेणार', काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

आरोग्यभरती संदर्भात विधानसभा अधिवेशनात पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. (Maharashtra Health Department Recruitment paper leak case) पोलिसांचा संपूर्ण अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा केली आहे.

पुढे वाचा ...
  गणेश दुडम, प्रतिनिधी, मावळ पुणे, 10 मे : आरोग्यभरती संदर्भात विधानसभा अधिवेशनात पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. (Maharashtra Health Department Recruitment paper leak case) पोलिसांचा संपूर्ण अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांचेही मत लक्षात घेतलं आहे. दोन्हीही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले. नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. किवळेतील सिम्बॉयोसिस विद्यापीठाच्या स्थापना दिवस निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी ते बोलत होते. राणा दाम्पत्याने राजकारण करण्याचं काम करू नये तर सिटी स्कॅन, MRI याठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पध्दत मी आरोग्यमंत्री असताना कुठे पाहिली नाही. अशा पद्धतीच फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल, पण हे चुकीचं आहे. यात आपण TRP वाढविण्यासंदर्भातील कारवाई करू नये. तसेच राणा दाम्पत्याने राजकारण करण्याचे काम करू नये. ही चुकीची पद्धत आहे, असे मत आरोग्यमंत्री टोपेंनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाने ह्यामध्ये स्थगिती दिली आहे. निलंबनाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. आमच्याकडे त्यांची सुनावणी सुरू आहे. आणखी आठ दिवस लागतील. सगळ्या बाजूची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. हेही वाचा - भाजप खासदाराचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; 'माफी मागा अन्यथा....'
   चौथ्या लाटेबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री?
  कुठेही कोरोनाची चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्णसंख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहेत. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्णसंख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील, असा अनुमान काढता आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Maharashtra News, Rajesh tope

  पुढील बातम्या