आई मृत्यूशी झूंज देत असताना मुलगा झटतोय कोरोनाग्रस्तांसाठी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सलाम!

आई मृत्यूशी झूंज देत असताना मुलगा झटतोय कोरोनाग्रस्तांसाठी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सलाम!

कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडला असताना, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कामगिरी पाहून त्यांच्या कर्तव्यदक्षतेचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री ही परिस्थिती कशी हाताळतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. दिवसरात्र एक करून आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सुद्धा त्यांची स्वत:ची आई अतिदक्षता विभागात असताना.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे विविध आजारांनी त्रस्त आहेत.  मागील वीस दिवसांपासून त्या बॉम्बे रुग्णालयमध्ये आहेत आणि अतिदक्षता (ICU) विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.

(हे वाचा-BREAKING भारत सरकारचा मोठा निर्णय! जगासाठी देशाचे दरवाजे बंद)

राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे डोळ्यात अंजन घालून प्रत्येक पाऊल उचलत आहेत. त्यांची कामगिरी सर्वांच्या नजरेत देखील येत आहे. मात्र याकरता त्यांना घरची सारी दु:ख बाजुला सारून काम करावं लागत आहे. केंद्र सरकारशी बोलण्यापासून ते राज्यात पत्रकार परिषद घेण्यापासून त्यांची सर्व धावपळ सुरू आहे. मात्र स्वत:ची माऊली आयसीयूमध्ये असताना त्यांना तिच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, कारण कोरोनाबाबत उपाययोजना आखण्यामध्ये ते व्यस्त आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचं भरभरून कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2020 06:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading