मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले...

'तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे पण सध्या निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही'

जालना, 04 डिसेंबर : 'आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट (corona third wave) ओमायक्रॉनची (Omicron Variant) देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे पण सध्या निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, तसं केल्यास लोकांना त्रास होईल, असं स्पष्ट मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी केलं.

जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ओमायक्रॉनबद्दल घेतल्या जात असलेल्या उपाययोजनेबद्दल माहिती दिली.

'ओमायक्रॉनची संसर्ग होण्याची गती जास्त आहे. मात्र त्याला घाबरण्याचं काम नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांना जे अनुभव आले त्यामुळे ओमायक्रॉनची दहशत वाटणं साहजिक आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे संसर्गाची भीती वाटते. मात्र आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, मास्क काढू नये असं आवाहन टोपे यांनी केलं.

Green Peas: तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात

'कर्नाटकात आतापर्यंत फक्त दोनच रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले असून सध्या राज्यात निर्बंध किंवा लॉकडाऊन लावला जाणार नाही. निर्बंध लावले तर लोकांना ते त्रासदायक ठरतील. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारने ज्या सूचना केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी सुरू आहे, असंही ते म्हणाले.

'12 वर्षावरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली असून केंद्राने याबाबतीत लवकर निर्णय घ्यावा. 5 वर्षाखालील मुलांना ओमायक्रॉनचा अधिक धोका आहे असं दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे यावर देखील टोपे यांनी भाष्य केले.

Thalapathy Vijay ते Suriya हे अभिनेते एका चित्रपटासाठी घेतात 30 ते 100 कोटी

'कोरोनाच्या दोन्ही लाटेत मुलांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती फार चिंताजनक राहिली नाही मात्र लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 12 वर्षांवरील मुलांना लसीकरण केलं पाहिजे. लहान मुलांच्या टास्क फोर्सनं देखील त्यांना लसीकरणाची मागणी केंद्राच्या आरोग्य विभागाकडे केली असून यावर केंद्राने निर्णय घ्यावा असं सांगत राज्यातील ऑक्सीजन उत्पादकांना सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे टोपे म्हणाले.

'तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे.लहान मुलांना काय आवश्यक असेल त्याचाही आढावा घेऊन तयारी केली आहे. पण ही लाट येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 85 टक्के पहिला तर 45-46 टक्के दुसरा डोस नागरीकांना दिलेला आहे.त्यामुळे दुसरा डोस नागरिकांनी तातडीने घ्यावा टाळाटाळ करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

First published:
top videos