Home /News /maharashtra /

आरोग्यमंत्री, अर्थमंत्री, सहकार मंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याचे साखर कारखाने लॉकडाऊनमध्येही सुरूच?

आरोग्यमंत्री, अर्थमंत्री, सहकार मंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याचे साखर कारखाने लॉकडाऊनमध्येही सुरूच?

विशेष म्हणजे हे साखर सम्राटांनी स्वतः च्या फायद्यासाठी ऊसतोड मजूरांना वेठीस धरले आहे. यात महाराष्ट्रतील उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि बड्या राजकीय नेत्यांचे डझनभर साखर कारखाने सुरूच आहेत.

बीड, 28 मार्च : संचार बंदी, जमावबंदी असताना शाळा, कॉलेज, कंपन्या, बस, रेल्वे, विमान सर्व प्रकारची वाहतुक बंद करून सारा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र ऊसतोड मजूर यांच्या जीवाशी खेळ करत साखर कारखाने सुरूच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे साखर सम्राटांनी स्वतः च्या फायद्यासाठी ऊसतोड मजूरांना वेठीस धरलं असून यात महाराष्ट्रतील उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि बड्या राजकीय नेत्यांचे डझनभर साखर कारखाने सुरूच असल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. दरम्यान, या आरोपांवर योग्य ती चौकशी करण्यात येईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कसलीही काळजी न घेता या कारखान्यांवर ऊसतोड मजूरांकडून जबरदस्तीने कामे करून घेतली जात आहे. कोरोनाची साथ सुरू असतानाही मंत्र्यांचे साखर कारखाने सुरू कसे असा सवाल ऊसतोड मजूर मंडळाचे माजी अध्यक्ष केशवराव आंधळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जबरदस्ती या मजुराकडून काम करून घेत असल्याचा आरोपही स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेचे राज्य अध्यक्षत्याच श्रीमंत जायभाये यांनी केला आहे. हे वाचा - तब्बल 3 हजार लावणी कलावंतांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत विशेष म्हणजे या चालू असलेल्या साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे कारखानेदेखील सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे या मंत्रीमहोदयांकडूनच ऊसतोड मजुरांच्य जीविताशी खेळ करण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही ऊसतोड मजूर मुकादम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. एकीकडे कोरोनाव्हायरस संकट असताना दुसरीकडे कारखानदारीच्या वागणुकीमुळे ऊसतोड मजूर अडचणीत सापडला आहे तर आम्हाला लवकर घरी जाऊ द्या अशी ही विनंती काही ऊसतोड मजूर यांनी केली आहे कारखाण्याची यादी सांगताना केले बरेच गौप्यस्फोट महाराष्ट्रात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्यामुळे ठाकरे सरकारने सुरूवातीपासूनच काळजी घेतली. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, वाहतुक बंद केली. शासन म्हणून कोरोनाची साथ अधिक प्रमाणात पसरू नये याची काळजी घेतली जात असली तरी राज्य सरकारमधील काही बडे मंत्री आणि नेत्यांनी त्यांचे साखर कारखाने अद्यापही बंद केलेले नाहीत. हे वाचा - 'आधी भारतातलं पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं नंतर दिला बाळाला जन्म' ऊसतोड मजूरांना कोरोनाची लागन होऊ नये याची कसलीही काळजी न घेता त्यांच्याकडून ऊसतोडणीचे काम करून घेतले जात आहे .महाराष्ट्रातील मंत्री मात्र आपले साखर कारखाने बंद करायला तयार नाहीत . मग मंत्र्यांचे साखर कारखाने ऍन्टी कोरोना व्हायरस आहेत का ? असा सवाल ऊसतोड मजूरांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे . यात छत्रपती साखर कारखाना भवानी नगर, शिरववळदत्त स . सा . कारखाना कोल्हापुर, गुरूदत्त स . सा . कारखाना कोल्हापुर, जवाहर स . सा . कारखाना कोल्हापुर, ईस्लामपुर स . सा . कारखाना सांगली, सह्याद्री स . सा . कारखाना सांगली जि . सातारा, वाळवा स . सा . कारखाना सांगली, कराड स . सा . कारखाना सातारा, विश्वास स . सा . कारखाना, सर्वोदय स . सा . कारखाना, किसनविर स . सा . कारखाना, भुईज स . सा . कारखाना सातारा, क्रांती स . सा . कारखाना पुलूस जि .सांगली हे साखर कारखाने अद्यापही सुरूच आहेत. हे वाचा - लॉकडाऊन असतानाही काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, खुनाचा LIVE VIDEO समोर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या