• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Health Department exam : राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी, परीक्षा कधी होणार दिली माहिती!

Health Department exam : राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी, परीक्षा कधी होणार दिली माहिती!


'आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो'

'आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो'

'आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो'

  • Share this:
जालना, 25 सप्टेंबर : हॉल तिकीटांमध्ये गोंधळ झाल्यामुळे आरोग्य विभागाला आपली परीक्षा (Maharashtra Health Department) रद्द करावी लागली आहे.  'न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. तसंच, 'परीक्षांची तारीख येत्या 8 ते 10 दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल', असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. (maharashtra Health department exam finally canceled ) आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यामुळे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परीक्षा नेमकी कोणत्या कारणामुळे रद्द झाली, याची माहितीही त्यांनी दिली. 'आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थींची माफी मागितली. Bigg Boss Marathi 3 : जय आणि मीनलमध्ये जेवणाच्या टेबलावर तुफान राडा तसंच, परीक्षेची जबाबदारी 'न्यासा'ची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्या, असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या 6 हजार 200 जागांसाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र, न्यासाकडे परीक्षेची सर्व जबाबदारी असताना न्यासा जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरली, असं सांगायलाही टोपे विसरले नाहीत. काय घडलं नेमकं? आरोग्य विभागातील  पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा  (Health Department Recruitment 2021) आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुढील परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील 6200 पदांसाठी परीक्षा होणार होती. राज्यभरात जवळपास 8 लाख उमेदवार परीक्षा देणार होते. Sex in the space : अंतराळवीर अंतराळात सेक्स करतात का? या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध झाले होते. यात अक्षय राऊत या उमेदवाराने वाशिम परीक्षा सेंट निवडलेले असताना त्याच्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशातील नोएडा हे परीक्षा केंदाचा (Exam Centre) पत्ता छापून आला होता. त्यामुळे मी काय उत्तर प्रदेशात जाऊन पेपर देऊ का? असा उद्विग्न सवाल या परीक्षार्थीने आरोग्य विभागाला विचारला होता.  एवढंच नाहीतर अनेक परीक्षांर्थींचे हॉल तिकिटच डाऊनलोड होत नाही, तर काहींमध्ये प्रचंड चुका होत्या. तर एका उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेश नोएडा मधील सेंटर आले होते. काही मुलांचे लिंगाबाबत चुकीची माहिती दिली होती. काहींच्या हॉल तिकिटावर फक्त कॉलेजच नाव होते. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली.
Published by:sachin Salve
First published: