गडचिरोली, 30 डिसेंबर : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात विजेचा प्रवाह सोडून वाघाची हत्या (tiger) करून मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाघाचा चेहरा आणि नखे बेपत्ता असल्याने वाघाचे अवयवाच्या तस्करीसाठी ही हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्रात अल्लापल्ली सिरोंचा रस्त्यावर मौसम गावालगत कक्ष क्रमांक 615 असून तिथे ही घटना घडली. या गावाला लागून जंगलातील नाल्यात दुर्गंधी आणि माशा उडत असल्याचे दिसल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या भागात धाव घेतली. त्या ठिकाणी एका वाळूच्या थरावर एक फांदी ठेवलेली होती आणि मोठ्या प्रमाणात माशा बसलेले दिसत होत्या. हे चित्र बघितल्यानंतर ही बाब वन कर्मचाऱ्यांनी आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांना याची माहिती कळवली.
(गोव्यात सुट्ट्या घालवणाऱ्या Shriya Saran चे विदेशी पतीसोबत किसींग सीन व्हायरल)
नितेश देवगडे यांनी वन कर्मचार्यांचा ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. तिथे असलेली वाळू काढून बघितल्यावर कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. हा मृतदेह वाघिणीचा असून तिचं वय चार ते पाच वर्ष असल्याची शक्यता आहे. हा मृतदेह पूर्ण वाढ झालेल्या असून या वाघिणीचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. त्यासोबत वाघाचे शिर धडापासून वेगळे करुन काढण्यात आले असून चारही पायाची नखे ही काढण्यात आली होती.
(झोपलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम)
मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत या ठिकाणी आढळले या वाघिणीची हत्या वीज प्रवाह सोडून करण्यात आली. आलापल्ली सिरोंचा या मार्गावरून जाणाऱ्या या मार्गावरून जाणाऱ्या अकरा केवी या विद्युत वाहिनीवरून एक किलोमीटर आतमध्ये जंगलापर्यंत विजेची तार सोडून वाघिणीची हत्या करण्यात आल्याचं घटनास्थळी दिसून आले आहे. वाघिणीची शिकार सात ते दहा दिवसापूर्वी झाल्याची शक्यता आहे. मृत वाघिणीचे धडापासून वेगळे झालेले शीर शोधण्याचा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी केला मात्र ते सापडले नाही, या वाघिणीच्या मृतदेहाचे संध्याकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. वाघिणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर वाघाचा विसरा, हाड आणि त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.