रंग धुण्यासाठी नदीत उतरला, पण हरीश आला नाही पाण्याचा अंदाज...

याठिकाणी काही तरुणांनी, अग्निशमन दलाने त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उड्या घेतल्या आणि हरीशला बाहेर काढलं.

याठिकाणी काही तरुणांनी, अग्निशमन दलाने त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उड्या घेतल्या आणि हरीशला बाहेर काढलं.

  • Share this:
गणेश गायकवाड, प्रतिनिधी उल्हासनगर, 10 मार्च : राज्यभरात आज रंगाची उधळण करत मोठ्या उत्साहात पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे खबरदारीने धुलीवंदन साजरा करण्यात आला. परंतु, उल्हासनगर शहरात होळी सणाला गालबोट लागलंय. उल्हासनगर जवळील रायता नदीत एकाचा बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हरीश डिंगरा असं ३५ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. हरीश हा उल्हासनगरचा रहिवासी आहे. होळी खेळून आल्यानंतर अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी हरीश हा रायता नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हरीष पाण्यात बुडत गेला. हरीश बुडत असताना याठिकाणी काही तरुणांनी, अग्निशमन दलाने त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उड्या घेतल्या आणि हरीशला बाहेर काढलं. मात्र, बाहेर काढण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये 3 जणांचा बुडून मृत्यू तर, चंद्रपूरमध्ये अंकित पिंपळशेंडे (वय 23) हा तरुण वर्धा नदीत बेपत्ता झाला. 4-5 मित्रांसह मारडा इथं वर्धा नदीवर रंगपंचमी साजरी करण्यासाठी आणि आंघोळी साठी गेले होते. दरम्यान, आंघोळी करिता नदी पात्रात सर्व उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने अंकित बुडाला. नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंकितचा शोध सुरू आहे. होळीच्या दिवशी आतापर्यंत जिल्ह्यात 3 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तिसरी घटना ही आज संध्याकाळी घडली. रंगोत्सवाचा गुलाल उधळून नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अखिल कामीडवार (वय 27) असं मृतकाचे नाव. पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथील रहिवासी असलेला हा युवक आज धुळवड साजरी करुन काही मित्रांसह अंधारी नदीपात्रात आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
First published: