10 वीचा पेपर देऊन घरी जात असताना विद्यार्थ्याची निघृणपणे हत्या, जीभही कापून टाकली

10 वीचा पेपर देऊन घरी जात असताना विद्यार्थ्याची निघृणपणे हत्या, जीभही कापून टाकली

त्याच्या घराजवळील गव्हाच्या शेतात त्याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला

  • Share this:

गोंदिया, 4 मार्च : दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने त्याची हत्या करुन याबाबत त्याने कोणाकडे वाच्यता करू नये, यासाठी त्याची जीभही कापली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या 17 वर्षांच्या मुलावर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला. मंगळवारी (3 मार्च) गोंदिया तालुक्यातील मोरवाही गावात सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली. अतुल अशोक तरोणे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीय शोकाकूल झाले आहेत.

मंगळवारी दहावीचा पेपर होता. त्यासाठी तो शाळेत गेला होता. तेथून घरी परतत असताना त्याच्या घरापासून साधारण 400 ते 500 मीटर अंतरावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तेथील जवळील गव्हाच्या शेतात त्याच्यावर चाकून हल्ला केला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. इतकचं नाही तर त्याने या हल्ल्यासंदर्भात कोणाकडे वाच्यता करू नये यासाठी त्याची जीभही कापण्यात आली आहे. हा मुलगा तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच अवस्थेत त्याला जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दरम्यान तो मरण पावला. सायंकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या शवविच्छेदनातून अनेक बाबी समोर आल्या.

हे वाचा - हुंड्यात बुलेट न दिल्यानं चार मित्रांकडून पत्नीवर गँगरेप, पतीनेच शूट केला VIDEO

जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही त्याच्या मारेकऱ्याला पकडण्यात आलेले नाही. याप्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांकडून हत्या करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2020 01:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading