• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • जेवण करून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही; मित्रानं गुप्तीनं वार करत दगडानं ठेचलं डोकं

जेवण करून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही; मित्रानं गुप्तीनं वार करत दगडानं ठेचलं डोकं

Murder in Karad: आरोपी तरुणानं आपल्या मित्रावर गुप्तीनं वार केल्यानंतर त्याचं डोकं दगडानं ठेचलं (Crushed head with stone) आहे.

 • Share this:
  कराड, 27 जून: दारू (Alcohol) पित असताना झालेल्या वादातून एका तरुणानं आपल्या मित्राची निर्घृण हत्या (Friend's Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं गुप्तीनं आपल्या मित्रावर वार केल्यानंतर त्याचं डोकं दगडानं ठेचलं (Crushed head with stone) आहे. या घटनेनंतर मृताच्या भावानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी मित्रावर गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. किरण मुकुंद लादे असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. किरण कराडमधील बुधवार पेठ येथील रहिवासी असून ते कराड पालिकेच्या घंटागाडीवर चालक म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी किरण नेहमीप्रमाणे घंटागाडीवर कामाला गेला. त्यानंतर दुपारी परत घरी आला. घरी जेवण केल्यानंतर तो पुन्हा घराबाहेर पडला. मात्र रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. नातेवाईकांनी त्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला मात्र त्याचा फोनही बंद लागत होता. त्यामुळे नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोधाशोध केली. पण त्याचा काही थांगपत्ता सापडला नाही. दरम्यान, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास चौंडेश्वरीनगर- गोवारे येथील पुलाच्या पश्चिमेस ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला किरणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. किरणच्या डोक्यात आणि कपाळावर अनेक खोल जखमा होत्या. किरणच्या डोक्यात दगडानं जोरदार वार केल्यानं या जखमा झाल्या होत्या. रात्रभर रक्त वाहिल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. हेही वाचा-आईनं बापासोबतच लावलं मुलीचं लग्न; बलात्काराला कंटाळून तरुणीनं केली पतीची हत्या शुक्रवारी रात्री मृत किरण आपला मित्र आकाश गवळी याच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दारू पित असताना दोघांत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला असावा, यातूनच आकाशनं किरणचा खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. किरणची हत्या झाल्यापासून आरोपी मित्र आकाश गवळी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: