अमरावती, 13 ऑक्टोंबर : मागच्या तीन महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता उलथावत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आमदार बच्चू कडू यांच्यासह अन्य अपक्ष आमदारांना पाठींबा दिला होता. दरम्यान बच्चू कडू यांना मंत्रीपदाची ऑफर मिळेल असे बोलले जात असताना त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज होते. दरम्यान पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता असली तरी त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. ते पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळी चूल मांडल्यानंतर बच्चू कडू हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होते, मात्र बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालेले नाही, मंत्रिमंडळात विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर अडीच वर्षानंतर मिळेल असे उलट उत्तर बच्चू कडू यांनी दिलं, यावरून मंत्रिमंडळात विस्तार न झाल्याने बच्चू कडू यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : 'तुम्ही भेदभाव करताय, आमची रणनीती तुम्हीच उघड केली'; ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर 12 'बाण'
निमीत्त अमरावती जिल्ह्यातील अतीवृष्टी
अमरावती जिल्ह्यातील अतीवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेली मदत यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडूंनी आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा दावा माध्यम प्रतिनिधींनी करताच बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. तुम्ही पाहात नसाल, तर माझ्यासोबत चला. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दाखवतो. दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
मंत्रीपद नेमकं कधी मिळणार?
बच्चू कडू यांनी नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेकदा माध्यमांशी बोलताना मंत्रीपदाविषयी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे, नेमकं मंत्रीपद मिळणार कधी? याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यांनाच प्रतिप्रश्न केला. यावर बोलायला मी काय प्रमुख आहे का? असा मिश्किल सवाल बच्चू कडूंनी केला.
हे ही वाचा : आमदार, चिन्ह, आता मतदार संघातला निधी थांबवला, शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाची गळचेपी
शिंदेंचा गट, भाजप यामध्ये आमच्या दोघांचा लहानसा प्रहार आहे. आम्हाला काय आता? मी तर मागेही म्हणालो होतो. आता नाही तर अडीच वर्षांनंतर मंत्रीपद मिळेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.