अमरावतीत कोरोनाचा कहर! आमदारांनासह 33 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, 2 दिवस कडक संचारबंदी

अमरावतीत कोरोनाचा कहर! आमदारांनासह 33 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, 2 दिवस कडक संचारबंदी

अमरावती शहरात शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

अमरावती, 11 जुलै: अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अमरावतीची कोरोनाबाधित रुग्णांची आता हजाराकडे वाटचाल सुरू आहे. अमरावती शहरात शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार देशपांडे यांच्यासह 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 828 झाली असून तर आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा...पुण्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय का? अजित पवार यांनी केला मोठा खुलासा

शहरात चार रॅपीड टेस्ट सेंटरमध्ये कोरोनाची चाचणी होत असल्याने तातडीने रुग्णांचे रिपोर्ट मिळत आहे, यामुळे उपचार करायला आरोग्य यंत्रणेला सोपे जात आहे. आतापर्यंत 565 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सध्या 233 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवस कडक संचार बंदीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. कर्फ्यूसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. 1200 कर्मचारी आणि 127 अधिकारी बंदोबस्ताच्या कामात व्यग्र आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहे.

कर्फ्यूचा पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संजीव कुमार बाविस्कर हे बंदोबस्तासाठी स्वतः रस्त्यावर उतरले असून शहरात 48 ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या बंदोबस्तासाठी बाराशे कर्मचारी व 127 अधिकारी लावण्यात आल्याचे पोलीस आयुक्त संजीव कुमार बाविस्कर यांनी सांगितले.

हेही वाचा...BMC च्या सहा.आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, 'हा' रेड झोन आणला होता ग्रीन झोनमध्ये

कोरोना रुग्णाच्या संखेत वाढ होत असल्याने कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून जिल्ह्या प्रशासनाकडून दोन दिवसाची संचारबंदी लावण्यात आलेली आहे. यामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. घराबाहेर विनाकारण फिरणार्‍या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करणार आहेत. शहरांमध्ये ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 11, 2020, 8:44 PM IST

ताज्या बातम्या