हतनूर धरण 27 वर्षांत प्रथमच कोरडेठाक..1992 मध्ये निर्माण झाली अशी स्थिती

हतनूर धरण 27 वर्षांत प्रथमच कोरडेठाक..1992 मध्ये निर्माण झाली अशी स्थिती

भुसावळ रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, भुसावळ, यावल, सावदा मोठ्या नगरपालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल 130 गावांना पाणीपुरवठा करणारे हतनूर धरण यंदा कोरडेठाक झाले आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ ,15 मे- भुसावळ रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, भुसावळ, यावल, सावदा मोठ्या नगरपालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल 130 गावांना पाणीपुरवठा करणारे हतनूर धरण यंदा कोरडेठाक झाले आहे.

388 दलघमी स्थापित पाणी क्षमता असलेल्या या धरणाचा 133 दलघमी मृतसाठा आहे. सध्या केवळ 133.60 दलघमी जलसाठा असल्याने अवघा 0.60 टक्के जिवंत जलसाठा धरणात शिल्लक आहे. 27 वर्षांपूर्वी 1992 मध्येही अशीच स्थिती निर्माण झाली होती. यानंतर 11 वर्षांपूर्वी अर्थात 2008 मध्येही हतनूरचा जलसाठा अवघ्या 2 टक्के शिल्लक होता. तब्बल 27 वर्षांनंतर प्रथमच हतनूर धरणाची इतकी बिकट स्थिती झाली आहे.

केवळ 24.67 दलघमी जलसाठा

हतनूर धरणाचा मृतसाठा 133 दलघमी आहे. 2007 च्या सर्वेक्षणानुसार मृत जलसाठ्यातील 133 दलघमीपैकी केवळ 24.67 दलघमी जलसाठा शिल्लक आहे. उर्वरित 108.33 दलघमी क्षेत्र गाळाने भरले आहे. 2007 च्या सर्वेक्षणानंतर 12 वर्षे उलटल्याने 24.67 दलघमी जलसाठ्यातही पून्हा गाळ वाढला. यामुळे मृतजलसाठा सध्या केवळ 12 दलघमी पाणी असावे, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मृतसाठ्यातून आता केवळ तापीनदीत 9 ते 10 दलघमीचे एकच आवर्तन सोडता येईल. तर जिवंत जलसाठ्यावर अवलंबून असलेल्या धरणाच्या वरील भागांना आता पाणीपुरवठा करता येणार नाही.

हतनूरची तांत्रिक माहिती...

-पाणलोट क्षेत्र – 29 हजार 430 चौरस किलोमिटर

-एकूण जलसाठा क्षमता - 388 दलघमी (13 हजार 700 एमसीएफटी)

-जिवंत जलसाठा - 255 दलघमी (9 हजार एमसीएफटी)

-मृतजलसाठा क्षमता - 133 दलघमी (4700 एमसीएफटी)

-धरणाचे दरवाजे - 41 (12.00 बाय 6.50 मिटर)

तुमच्या ताटातली भाजी 'या' नाल्याच्या पाण्यातून पिकवलेली तर नाही ना? मग VIDEO पाहाच!

First published: May 16, 2019, 4:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading