मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''चंद्रकांत पाटील सर्वांचे मास्टरमाईंड'', सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांचा घणाघात

''चंद्रकांत पाटील सर्वांचे मास्टरमाईंड'', सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांचा घणाघात

या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

मुंबई, 20 सप्टेंबर: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा दुसरा घोटाळा उघड केला. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा (Scam) केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला. या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे मास्टरमाईंड आहेत, असा घणाघात मुश्रीफ यांनी केला आहे. सोमय्या जे आरोप करतायत ते भाजपचं षडयंत्र आहे. चंद्रकांत पाटील यांचे मास्टरमाईंड आहेत. भाजप सतत मला कसा थांबवता येईल याचा प्रयत्न करत असल्याचं हसन मुश्रीफ म्हणालेत. भाजपमध्ये येण्याची मला विनंती केली होती. जिल्ह्यात भाजप आज 0 आहे. चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं. पण अमित शाह यांच्या मध्यस्थीने थांबलं. देवेंद्र फडणवीस सांगतात त्याप्रमाणे ते वागतात. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ पाळून लढावं, अशी घणाघाती टीका हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर केली आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलंय की गप्प बसून चालणार नाही. चंद्रकांत पाटलंच्या प्रेशरखाली हे होतंय. चंद्रकांत पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत. मी किरीट सोमय्या यांचा आभारी आहे की, त्यांनी माझ्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या सातत्यानं सांगतात की, मी ही कागदं काढतो आणि फडणवीसांकडे घेऊन जातो. पुढे ते सांगतात तसंच मी करतो. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थानं लढावं, असं कुणाचातरी वापर करुन बदनामी करुन, माझ्या कुटुंबियांची बदनामी करुन त्यांना काहीही मिळणार नाही. माझ्यावर करण्यात येत असलेले सगळे आरोप खोटे आहेत. बिनबुडाचे आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया मागेही मी या आरोपांचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयांचा फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे, असं ही त्यांनी सांगितलं आहे. आजही सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या खोट्या आरोपांमुळे त्यांची सीएची पदवी खरी आहे का? असा प्रश्न पडतोय. मला त्यांना सांगायचंय की, मी तुमच्याकडे एकदा सीए पाठवतो आणि जे दोन माझ्यावर आरोप केलेत. त्याबद्दल सविस्तर माहिती घेतल्यावर त्यांच्या लक्षात येईल की, हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे, असंही ते म्हणालेत. हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  देवेंद्र फडणवीस सांगतात त्याप्रमाणे ते वागतात. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ पाळून लढावं.100 कोटींचा मी दावा करणार, त्याची तयारी सुरू आहे. हा आता नवा दावा फोल आहे. खोटा आहे. माझ्यावर जे आरोप केले यावरुन लक्षात येईल की मी कसा माणूस आहे. जी जी संधी मला मिळाली ज्यामुळे लोक माझ्याशी जोडले गेलेत. आजच्या आरोपसाठी त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझ्या जावयाचा काही संबंध नाही. कंगणा राणौत अंधेरी कोर्टात, 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुनावणी पुढे ढकलली 2020 ला ही कंपनी सोडली. 10 वर्षांपूर्वी सहयोगी तत्वावर हा कारखाना घेतला होता. पण 2 वर्षांपूर्वीच त्यांनी कारखाना सोडला.कारण नुकसान होत होतं. जिल्हा मध्यवर्ती बँकेने बिडिंग केलेच नाही. सरकारने दिला होता. उलट 75 कोटी रुपये त्या कंपनीला तोटा आहे. जो किरीट सोमेयां यांनी भरून द्यावा. मी 100 अधिक आता 50 कोटी असा दावा दाखल करणार आहे. तुम्ही पर्यटन कशाला करताय. घोटाळेबाज म्हणतात.सुपारी दिल्यावर तुम्ही काम करा. तुम्ही न्यायाधीश नाही. मी 17 वर्षे काम केलंय एकही आरोप झाला नाही. भाजपच्या काळात चिक्की घोटाळे, जमीन घोटाळे झाले त्यांची कागदपत्र काढावी. रात्रभर नाट्य, कऱ्हाडमध्ये ताब्यात घेतलेले सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीला अस्थिर करायचा ते प्रयत्न करतात हे होणार नाही.पवार साहेबांचं ते नाव घेतात त्यांची लायकी आहे का उद्धव ठाकरेंचा नाव ते कशाला घेतात?.महाविकास आघाडीने कर्जमाफी, शिवभोजन थाळी आणि आता मध्यान्ह भोजन हो योजना सुरू केली कसे बेताल आरोप करतात. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलंय की गप्प बसून चालणार नाही.चंद्रकांत पाटलंच्या प्रेशरखाली हे होतंय. आम्ही फेविकोल आहोत, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोललो. जारांडेश्वर हा आदर्श कारखाना आहे.कारखाना आत जाऊन पहा. या कारखान्याला 60 हजार लोकांनी पैसे दिले आहेत.शिवसेनेच्या प्रश्नावर हे उत्तर आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर एफआयआर करणार. त्यांचा घोटाळे किती मोठे झाले.
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya

पुढील बातम्या