हर्षवर्धन जाधवांचा नवा व्हिडिओ समोर, रावसाहेब दानवेंवर केला गंभीर आरोप

हर्षवर्धन जाधवांचा नवा व्हिडिओ समोर, रावसाहेब दानवेंवर केला गंभीर आरोप

हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय सन्यास घेतल्यानंतर आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 30 मे : माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातला गृहकलह आता आणखी वाढत चालला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी आता आणखी एक व्हिडिओ जाहीर केला असून आपला फोन टॅप करीत असल्याचा आरोप केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय सन्यास घेतल्यानंतर आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड करून रावसाहेब दानवे यांना इशारा दिला आहे.

माझा फोन टॅप करण्यात आला आहे. त्यामुळे मला कोण फोन करत आहे, याची संपूर्ण माहितीही रावसाहेब दानवे यांच्याकडे जाते. त्यामुळे ते तुमच्यासोबत काहीही करू शकता, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर केला आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात वाहिला रक्ताचा पाट, पतीनं कोयत्याने केली पत्नीची हत्या

तसंच, रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री आणि अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्यामुळे ते काहीही करू शकता, कृपया मला कुणीही फोन करू नये, अशी विनंतीच जाधव यांनी केली.

'घरातला वाद जितका चव्हाट्यावर आला तो आता थांबला पाहिजे. यापुढे मी कोणताही व्हिडिओ टाकणार नाही, सगळे व्हिडिओ डिलीट करावे, अशी ग्वाहीही जाधव यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी हर्षवर्धन जाधव यांनी एक  व्हिडिओ युट्युबवर अपलोड  केला आहे. जाधव यांनी उघडपणे आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

हेही वाचा-जुळ्या लेकरांनी कोरोनाला हरवलं, पण आईचे छत्र गमवलं!

'तुम्हाला वाटतं मी फार फडफड करतोय. याला कुठेही धरून कापून टाकू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे  छक्के पंजे  असलेले अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे सर्व व्हिडिओ बाहेर काढले.  हे व्हिडिओ वकिलांना पाठवले आहे', असा इशाराच जाधव यांनी दानवेंना दिला होता.

'या व्हिडिओमुळे माझ्या जीविताला काही झाले किंवा तुम्ही केंद्रीय मंत्री असल्यामुळे माझ्यावर पोलीस सोडले तर मी आत्महत्या करेल. माझ्या आत्महत्येनंतर हे सर्व व्हिडिओ बाहेर येतील. मी आत्महत्या केली तर तुमचे बारा वाजतील. माझ्या आत्महत्येला रावसाहेब दानवे जबाबदार राहतील', असा थेट आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.

विशेष म्हणजे, 23 मे रोजी हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून ही माहिती दिली. गेल्या आठवड्याभरापासून घरातील वाद चव्हाट्यावर आणल्यानंतर खुद्द जाधव यांनी आता आणखी वाद नको, म्हणत गृहकलहावर पडदा टाकला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 30, 2020, 2:03 PM IST

ताज्या बातम्या