हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, आईने सुनेविरुद्ध केली तक्रार

हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, आईने सुनेविरुद्ध केली तक्रार

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद,12 मार्च:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस्विनी जाधव यांनी सून संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच आपल्या मुलाविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला होता. हेच या वादाचं मूळ कारण सांगण्यात येत आहे. आपल्या वडिलांवर आरोप केल्याने संजना जाधव या चांगल्याच संतापल्या आहेत. यावरून त्यांनी तेजस्विनी जाधव आणि संजना जाधव यांच्यात तूतू-मैमै सुरु आहे. आता हा वाद विकोपाला गेला असून थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आहे.

हेही वाचा..शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींना संधी देताच खैरेंनी नाराजी व्यक्त करत केला गौप्यस्फोट

हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा..

एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच आपल्या मुलाविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला होता. आपले वडील रावसाहेब दानवे यांच्यावर करण्यात आलेला आरोप संजना जाधव यांना सहन झाला नव्हता. यावरून सासू-सुनेमध्ये वाद सुरु आहे.

हेही वाचा....तर घरात बोभाटा करीन; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं 15 वर्षीय दीराला केलं मजबूर

काय आहे प्रकरण?

हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉट शेजारी पीडित व्यक्तीची टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

First published: March 12, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading