• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • हर्षवर्धन जाधव यांचा नवा VIDEO, रावसाहेब दानवेंसह चंद्रकांत खैरेंवर केले सणसणीत आरोप

हर्षवर्धन जाधव यांचा नवा VIDEO, रावसाहेब दानवेंसह चंद्रकांत खैरेंवर केले सणसणीत आरोप

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • Share this:
औरंगाबाद, 19 जून: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सासरे रावसाहेब दानवे यांच्यालह शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सणसणीत आरोप केले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी माला वेडं ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, आता आपण डोक्याला कफन बांधले आहे. त्यामुळे आता आपण त्यांना घाबरत नसल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. हेही वाचा...अघोरी पणाचा कळस! 8 महिन्यांच्या बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्यानं चटके दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय जाहीर केला होता. तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. हर्षवर्धन जाधव तेव्हा महाबळेश्वरला एका मेडिटेशन सेंटर होते. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध प्रकारचे छंद जोपासत आहेत. मीही आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण विनाकारण काही गोष्टीमागे पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत यांची जाणीव झाली आणि त्यातून राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं होतं. एवढंच नाही तर पत्नी संजना जाधव ही राजकारणातील त्यांची उत्तराधिकारी असेल. यापुढे राजकारणाशी संबंधित सगळे निर्णय तिच घेईल. प्रत्येक घरात काही कुरबुरी होत असतात, तशा आमच्याही घरात झाल्या. मी खंबीरपणे संजना जाधव यांच्या पाठीशी उभा राहिल, असंही हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं होतं. हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेतल्यानंतर आपले सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड करून रावसाहेब दानवे यांना इशारा दिला होता. माझा फोन टॅप करण्यात आला आहे. त्यामुळे मला कोण फोन करत आहे, याची संपूर्ण माहितीही रावसाहेब दानवे यांच्याकडे जाते. त्यामुळे ते तुमच्यासोबत काहीही करू शकता, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर केला होता. हेही वाचा...मोठा निर्णय! मुंबईतील मोनो रेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द तसंच, रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री आणि अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्यामुळे ते काहीही करू शकता, कृपया मला कुणीही फोन करू नये, अशी विनंतीच जाधव यांनी केली होती.
First published: