हरियाणामध्ये भाजपला धक्का देणारा एकमेव एक्झिट पोल, बहुमतापासून राहणार दूर?

हरियाणामध्ये भाजपला धक्का देणारा एकमेव एक्झिट पोल, बहुमतापासून राहणार दूर?

एका संस्थेनी वर्तवलेल्या अंदाजाने भाजपला धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी या निवडणुकांच्या निकालाबाबतचे अंदाज व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. मात्र हरियाणाबाबत एका संस्थेनी वर्तवलेल्या अंदाजाने भाजपला धक्का बसला आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज इंडिया टुडे-माय अॅक्सिसच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण 90 जागा असलेल्या हरियाणात भाजपला 32 ते 44 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळतील, असं या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. त्यामुळे देशभरात सुसाट निघालेला भाजपचा विजयरथ हरियाणात अडखळणार का, हे पाहावं लागेल.

महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 09:44 AM IST

ताज्या बातम्या