गोंदियात जहाल माओवाद्याचं आत्मसमर्पण, केला मोठा खुलासा

गोंदियात जहाल माओवाद्याचं आत्मसमर्पण, केला मोठा खुलासा

माओवादी त्याला फूस लावून जंगलात फिरायला घेऊन गेले. फक्त 15 दिवस आमच्या सोबत फिरायला जंगलात चल म्हणून नक्षली त्याला घेऊन गेले आणि तिकडेच ठेवून घेतलं.

  • Share this:

गोंदिया 27 मे : माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी विविध योजना हाती घेतल्यात. धडक कारवाई करण्यासोबतच माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश येत असल्याचं दिसतंय. गोंदियात एका जहार माओवाद्यानं आत्मसर्पण केलं असून त्याने मोठा गौप्यस्फोटही केलाय.

देशातील नक्षल चळवळीला प्रतिबंध व्हवा व अधिकाधिक नक्षल वाद्यांनी आत्मसमर्पण  करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नक्षल आत्मसमर्पण योजना चालविली जाते. या योजने मार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील एक 27 वर्षांचा जहाल माओवाद्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. जगदीश उर्फ महेश विजय अगणू गावडे असं त्या जहाल नक्षलवाद्याचं नाव आहे.

मुळचा गडचिरोली  जिल्ह्याच्या  कोरची गावातला  जगदीश 2012 मध्ये मावाद्यांच्या  संपर्कात आला. माओवादी त्याला फूस लावून जंगलात फिरायला घेऊन गेले. फक्त 15 दिवस आमच्या सोबत फिरायला जंगलात चल म्हणून नक्षली त्याला घेऊन गेले आणि तिकडेच ठेवून घेतलं. 2012 पासून जगदीश परत नक्षलांच्या भितीने गावी  आलाच नाही. शेवटी त्याने चळवळीत सहभाग नोंदवत तीन पोलिसांचा खात्मा केल्याने त्याला नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य मिलिंद तुमडाम यांचा अंगरक्षक म्हणून जगदीशने  कुरखेडा कोरची ककोडी दलम मध्ये काम केलं. नक्षलवाद्यांना स्थानिक  तेंदूपत्ता तसेच रस्ते बांधकाम व्यावसायिक पैसे पुरवत असल्याचा गौप्यस्फोट जगदीश ने केला आहे.

मात्र येत्या काही दिवसात पोलिसांच्या माओवाद्यांविरुद्ध होणाऱ्या कारवाया पाहता जगदीशचं आत्मसमर्पण ही मोठी घटना आहे. हातातील बंदूक सोडून समाजाच्या  मुख्य प्रवाहात येण्यासाठी गोंदिया पोलिसानं समोर आत्मसमर्पण करण्यासाठी हजर झाल्याने जगदीशला गोंदिया पोलीस आत्मसमपर्ण योजनेचा लाभ देणार आहे. गेल्या 20 वर्षात गोंदिया जिल्ह्यात  19 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याची माहिती गोंदियाच्या पोलीस अधिक्षक विनिता साहू यांनी दिलीय.

First published: May 27, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading