Home /News /maharashtra /

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याने रेल्वे समोर घेतली उडी, 16 जणांवर गुन्हा दाखल

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याने रेल्वे समोर घेतली उडी, 16 जणांवर गुन्हा दाखल

ज्यांनी छळ केला त्यांची नावे या सुसाईड नोटमध्ये होती. त्यामुळे पोलिसांनी 16 अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

 नाशिक, 12 ऑक्टोबर : रेल्वे अधिकाऱ्यांच्या (Railway Officer) जाचाला कंटाळून (harassment) एका कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रेल्वेच्या 16 अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध येवला (yevala nashik)  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोट लिहून वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. रेल्वेचे अधिकारी (Railway Officer) कोणालाही जुमानत नाही. मनमानी करतात असा आरोप नेहमी केला जातो. अधिकाऱ्यांच्या मनमानीचा एक निरपराध कर्मचारी बळी ठरल्याची खळबळजनक घटना येवला तालुक्यात घडली आहे.  या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून भाऊसाहेब गायकवाड या कर्मचाऱ्याने रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली होती. त्याच्याकडे आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांवर येवला तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलच्या कव्हरमुळे मृत्यूच्या दाढेतून परत आला व्यक्ती; गोळीबार होऊनही वाचला दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर तारूर रेल्वे स्टेशन हद्दीत भाऊसाहेब गायकवाड खलासी म्हणून कार्यरत होते. 5 ऑक्टोबर रोजी त्यांनी रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली होती त्यात त्यांनी वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. तसंच ज्यांनी छळ केला त्यांची नावे या सुसाईड नोटमध्ये होती. त्यामुळे पोलिसांनी 16 अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध  विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. मटका अन् दारुबंदीसाठी 'शोले' स्टाइल आंदोलन; तेरा तासांपासून तरुण टॉवरवर ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे माझ्या वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी मयत भाऊसाहेब गायकवाड यांची मुलगी मंगला गायकवाड हिने केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nashik, Suicide

पुढील बातम्या