मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमृता फडणवीस यांनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! काय उपमा दिली पाहा...

अमृता फडणवीस यांनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! काय उपमा दिली पाहा...

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहा (Amit shah) यांना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी tweet करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी दिलेल्या उपमेवरून अमृता यांना काही यूजर्सनी ट्रोल केलं.

मुंबई, 22 ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या Twitter आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांची आणि ठाकरेंचं Twitter war अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांना अमृता फडणवीस यांनी tweet करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी शाहांना दिलेल्या उपमेवरून काही यूजर्सनी अमृता यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

अमृता फडणवीस यांनी अमित शाहा यांना शुभेच्छा देताना शाहांबरोबरचा एक कौटुंबिक फोटोही शेअर केला आहे. अमित शाहांना आधुनिक भारताचे चाणक्य असं म्हटलं आहे. त्यांनी तसा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे.  अमित शाहा हे गेलं दशकभराहून अधिक काळ भाजपसाठी रणनीती ठरवत आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं. कधीही मिळाल्या नाहीत, एवढ्या जागा पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळाल्या. तेव्हापासून अमित शाहा यांना भाजपचे चाणक्य म्हटलं जात होतंच. पण अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा देताना आधुनिक भारताचे चाणक्य अशी उपमा दिली.

त्यावर काही नेटकऱ्यांनी त्यांची पोस्ट लाइक केली, तर इतर काहींनी ही संधी साधत त्यांना ट्रोल केलं.

अमृता फडणवीस आणि शिवसेना नेते यांच्यामधला Twitter वाद अजूनही सुरूच आहे. त्यामुळे फडणवीस विरोधकही सोशल मीडियावर अमृता यांना उत्तर द्यायला कायम सक्रिय असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधल्या पत्रवादानंतर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू उचलून धरत ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांचं नाव घेत थेट शाब्दिक हल्ला केला. "आमचं तोंड उघडलं तर अमृता फडणवीस यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही", अशा शब्दांत सेनेच्या सभागृहनेत्या राऊत यांनी अमृता यांना सुनावलं होतं.  त्यावर आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्याकडे घर नाही दार नाही. मग काय पाडणार बुलडोझर सरकार? असं विचारणारं Tweet त्यांनी विशाखा राऊतांना प्रत्युत्तर म्हणून केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, Amruta fadnavis