मुंबईत मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात मुंबईत अनेक मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्यरात्री 1 वाजल्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. नाशिकमध्येही कार्यकर्त्यांची धरपकड नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. भद्रकाली पोलिसांनी जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आहे. छपरीच्या तालीम परिसरातील श्री जबरेश्वर या छोट्या मंदिरासमोर हनुमान चालीसा लावून कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी अॅप्लिफायरसह इतर साहित्य जप्त केलं आहे. नाशकात पोलिसांचा चोख बंदोबस्त नाशिकमध्ये सर्वच मशिदीबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. अनेक मशिदीवरील भोंगे आज वाजले नाही. तर काही ठिकाणी कमी आवाजात अजान झाली. नोटीस आणि पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप आल्याचं नाशकात पाहायला मिळालं. नाशिक शहरात केवळ दोन मशिदीमधून भोंग्याद्वारे पठाण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी (mumbai police) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने राज ठाकरे यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे यांनी ही नोटीस बजावली आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर राज ठाकरे पत्रक प्रसिद्ध करून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज एक पत्र प्रसिद्ध करून सर्वांना आवाहन केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.नवी मुंबईमध्ये मनसैनिक आक्रमक नेरुळ च्या मशिद परिसरात मनसेकडून हनुमान चालिसाचं वादन pic.twitter.com/4Tp44rZJaB
— News18Lokmat (@News18lokmat) May 4, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray (Politician)