हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात, CRPF जवानासह दोघांचा मृत्यू

हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात, CRPF जवानासह दोघांचा मृत्यू

विनोद झाडे आणि फलजी भाई पटेल हे मृत्यू झालेल्या सुरक्षा कर्मींची नावं आहेत. झाडे हे पोलिस विभागाचे तर पटेल हे सीआरपीएफचे जवान असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 26 सप्टेंबर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला मोठा अपघात झाला असून या अपघातात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. विनोद झाडे आणि फलजी भाई पटेल हे मृत्यू झालेल्या सुरक्षा कर्मींची नावं आहेत. झाडे हे पोलिस विभागाचे तर पटेल हे सीआरपीएफचे जवान  असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हंसराज अहिर हे गुरुवारी सकाळी ताफ्यासह चंद्रपूर येथून नागपूर विमानतळावर दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले होते. तेव्हा हा अपघाता झाल्याचं सांगण्यात येत आहे.

महामार्गावरून जात असताना वर्धा जिल्ह्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर हा अपघात झाला. अहिर बसून असलेले वाहन पुढे गेल्यावर अचानक जनावर आडवे आल्याने पुढचा कंटेनर अनियंत्रित झाला. यामागचे सुरक्षा वाहन भरधाव वेगातील कंटेनरला धडकले. यात दोन जवान गंभीर जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आता या संपूर्ण अपघाताची चौकशी करत आहेत.

अपघात झाल्यानंतर स्वतः अहिर हे जखमी जवानांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. बाकी जखमींवर उपचार सुरू आहे असल्याची माहिती आहे. मृत सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू, अपघाताचा थरारक व्हिडिओ

गुरुवारी पहाटे एका कार आणि ट्रकचा अपघात झाला होता. या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली होती. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. याच मुसळधार पावसामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. अहमदनगरच्या दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली  आहे. हे चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

इतर बातम्या - गाडीचे पेपर नाही म्हणून फाडली 35 हजारांची पावती, धक्क्याने रिक्षा चालकाचा मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ ट्रक (MP 09 HH 8378) आणि कारचा (MH 04 BY 4857) भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन तर नगर तालुक्यातील वाळकी इथला एकजण असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - नवी मुंबईत पुरुषावर 5 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार!

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 02:25 PM IST

ताज्या बातम्या