• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • फासावर लटकावा पण मागे हटणार नाही, कोर्टाच्या आदेशाने एसटी कर्मचाऱ्यांना रडू कोसळले

फासावर लटकावा पण मागे हटणार नाही, कोर्टाच्या आदेशाने एसटी कर्मचाऱ्यांना रडू कोसळले

शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

 • Share this:
  लातूर, 05 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये (mva government) विलीन करण्यासाठी मागणीसाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (st bus strike in maharashtra) सुरू आहे. हायकोर्टानेही (mumbai high court) आंदोलन मागे घ्यावे, असे आदेश दिले आहे. पण, जेलमध्ये टाका किंवा फासावर लटकावा पण मागे हटणार नाही, असा पवित्रा लातूरच्या (latur) एसटी बस कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लातूरमध्ये एसटी बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे लातूर जिल्हाभरातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. वाढदिवसालाच विराटच्या फेवरेट खेळाडूला धक्का, बुमराहने केला विक्रम मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानं न्यायालयाच्या आदेशाची सर्वच वाट पाहत होते. या प्रकरणाची सुनावणी पुढं ढकल्यामुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे जिल्हाभरात आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या पोहचल्या आहे. 'अटक काय फासावर लटकावा पण आंदोलन थांबणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी आपली भूमिका मांडत असताना कर्मचारी भावुक झाले आणि त्यांना अश्रू देखील अनावर झाले. मनमाड रेल्वे स्थानकावर टळला मोठा अनर्थ, एक्स्प्रेसच्या डब्याची तुटली कपलिंग! दरम्यान, दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करून एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साध घातली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती परब यांनी दिली. तसंच, संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, अशी विनंतीही केली होती.
  Published by:sachin Salve
  First published: