राहुल खंदारे, बुलडाणा 16 सप्टेंबर : पोलीस भर्तीचं स्वप्न बाळगून सकाळी लवकर उठून त्यासाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर - पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भर्तीसाठी व्यायाम करत होते. यावेळी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. तरुण व्यायाम करत असताना याच मार्गावरून मलकापूर आगाराची बस जात होती. या बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून पोलीस भर्तीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडले.
Video : शिक्षणासाठी जीव धोक्यात, मुलांना कडेवर घेऊन नदीतून करावा लागतो प्रवास
या बसचा चालकाच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागला. यात दोन तरुणांचे हात कापले गेले. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून खाली पडले.
तुमचं दूध कुत्र्याने चाटलं तर नाही ना? धक्कादायक Video समोर आल्याने खळबळ
विकास गजानन पांडे आणि परमेश्वर पाटील अशी या दोन्ही तरुणांची नावं आहेत. त्यांच्यावर सध्या मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलविल्याची माहिती मिळत आहे.
बुलडाण्यातील मलकापूर - पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भर्तीसाठी व्यायाम करत असताना बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून दोघांचे हात तुटले pic.twitter.com/J64fnCNJJG
— News18Lokmat (@News18lokmat) September 16, 2022
सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Shocking news