'हात नसले म्हणून काय झालं...' रक्षाबंधनाचा VIDEO पाहून सोलापूरच्या या बहिणीला कराल सलाम!

'हात नसले म्हणून काय झालं...' रक्षाबंधनाचा VIDEO पाहून सोलापूरच्या या बहिणीला कराल सलाम!

हात नसले म्हणून काय झालं, असं म्हणत पायात ताम्हन धरून मानलेल्या मुस्लीम भावाला ओवाळणाऱ्या सोलापूरच्या लक्ष्मीच्या जिद्दीला सलाम!

  • Share this:

सोलापूर, 3 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha bandhan) सेलेब्रिटींच्या ओवाळणीचे, सिनेमासारख्या चकचकीत राखी पौर्णिमा सेलिब्रेशनचे फोटो आणि VIDEO चिक्कार पाहिले असतील. पण सोलापूरच्या या बहिणीचा VIDEO एकदा बघाच.

धडधाकट तरुण नैराश्याने ग्रासलेले असताना तर या बहिणीची जिद्द, तिची सामान्य आयुष्य जगण्याची आस प्रेरणादायी वाटते. हात नाहीत म्हणून काय झालं, असं म्हणत तिने सर्वसामान्य मुलीप्रमाणे भावाला पायाने औक्षण केलं. पायांच्या बोटांत पकडून व्यवस्थित राखीही बांधली, तेही आपल्या मानलेल्या भावाला. या मुस्लीम भावाला राखी बांधतानाचा हा VIDEO निश्चितच प्रेरणादायी ठरतो तो लक्ष्मीच्या हसतमुख चेहऱ्यामुळे.

सोलापुरात लक्ष्मी शिंदे नावाच्या विद्यार्थीनीला दोन्ही हात नाहीत. पण नशिबाला दोष न देता ती आयुष्य आनंदाने जगायचा प्रयत्न करत आहे.

सोलापुरातच नव्हे तर देशभरात लक्ष्मी शिंदेची हे आगळं वेगळं रक्षाबंधन या VIDEO मुळे पोहोचलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 3, 2020, 11:08 PM IST

ताज्या बातम्या