Home /News /maharashtra /

प्रजासत्ताक दिनी अपंग शिक्षकाचा गांधीजींच्या वेशभूषेत आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनी अपंग शिक्षकाचा गांधीजींच्या वेशभूषेत आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनी अपंग शिक्षकाने स्मशानभूमीच्या छतावर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

    सोलापूर,26 जानेवारी: प्रजासत्ताक दिनी अपंग शिक्षकाने स्मशानभूमीच्या छतावर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. आनंद जाधव असे या शिक्षकाचं नाव आहे. माढा तालुक्यातील वडशिंगे येथे ही घटना घडली. आनंद जाधव यांनी रॅकेलचा ड्रम घेऊन स्मशानभूमीवर चढून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आनंद जाधव हे सोजर मूकबधीर निवासी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. संस्थाचालकाने त्यांना मागील 15 वर्षांपासून शाळेतून बेदखल केले आहे. न्याय मिळण्यासाठी आनंद जाधव यांनी स्मशानभूमीच्या छतावर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस आणि स्थानिक नागरिकांना हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सोजर मूकबधीर निवासी शाळेचे संस्थापक विश्वास बारबोले आणि सचिव अरुण बारबोले यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप आनंद जाधव यांनी केला आहे. मागील 15 वर्षांपासून पीडित शिक्षकाचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील शेतकरी रमेश लंगोटे यांनी प्रजासत्ताक दिनीच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलिस निरीक्षक किरण अवचर आणि त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शेतकरी रमेश लंगोटे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून कृषी कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. रमेश लंगोटे यांनी 2014-15 मध्ये शेडनेट उभारणीसाठी चळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून कर्ज घेतले होते. दरम्यान शेती मालाला भाव मिळत नसल्याने ते कर्जबाजारी झाले. श्री. लंगोटे यांच्यावर एकून 12 लाख 50 हजार रुपयांचं कर्ज आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सचिवाला मारहाण दुसरी घटना अमरावती जिल्ह्यातील आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील राहिमापूर चिंचोली येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपताच गुणवंत मानकर या गावकऱ्यांने ग्रामसचिवाला शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. मागील 5 महिन्यांपासून मागितलेले दस्तावेज देण्यासाठी सचिवाने टाळाटाळ केल्याने त्याला मारहाण केली असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुणवंत मानकर यांना अटक केली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Maharashtra news, Suicide attempt

    पुढील बातम्या