पोलिसांच्या जाचाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले ईशु सिंधुंचे नाव

पोलिसांच्या जाचाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले ईशु सिंधुंचे नाव

शिर्डी जवळील रूई गावातील सुदेश प्रभाकर भारती या व्यक्तीने पोलिसांच्या आणि दोन तरुणांच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी खोट्या गुन्हयात अडकवून पैसे घेतल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहून त्याने आत्महत्या केली.

  • Share this:

हरीष दिमोटे, (प्रतिनिधी)

अहमदनगर, 16 मे- शिर्डी जवळील रूई गावातील सुदेश प्रभाकर भारती या व्यक्तीने पोलिसांच्या आणि दोन तरुणांच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी खोट्या गुन्हयात अडकवून पैसे घेतल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहून त्याने आत्महत्या केली.

शिर्डी शेजारी असणाऱ्या सुदेश भारती या 44 वर्षीय व्यक्तीने काल (ता.15) स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. कुटूंबिय बाहेरगावी गेलेले असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येपूर्वी सुदेशने पोलीस अधिक्षक ईशु सिंधु, अप्पर अधिक्षक रोहिदास पवार आणि शिर्डी उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे. आप्पासाहेब बाबुराव शिरसागर आणि अन्वर मन्सुर शेख या दोघांनी आपल्याला चोरीच्या गुन्ह्यात गोवले. एलसीबीने घरातून काही न सांगता नेले. शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी चव्हाण यांनी पत्नी अन्नपूर्णा हिला चाळीस हजार रूपये दे नाहीतर नवऱ्याला मोठ्या जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. पत्नीने उसणवार करून पैसे भरले असे सांगत माझ्यावर अन्याय झाला. अपंगासाठी कायदा काढला तो कुठे गेला असा सवाल उपस्थीत करत कायदेशीर कारवाईची याचना सुदेशने चिठ्ठीत केली आहे.

आप्पासाहेब बाबुराव शिरसागर याला कमी पैशात अन्वर मन्सुर शेखकडून मोबाइल मिळेल, असं सुदेशने सांगितल होतं. पोलीसांनी चोरीच्या मोबाइल केसमध्ये शिरसागर आणि शेख यास ताब्यात घेतले. नंतर सुदेशलाही पोलीसांनी आरोपी करत जेलमध्ये डांबले होते, अशी माहिती सुदेशची सासू सुशिलाबाई गोसावी यांनी दिली. नगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्या कुटूंबाला काहीही माहिती न देता महिन्याभरापूर्वी रात्री सुदेश घरी जेवण करत असताना त्याला अपहरण केल्यासारखे उचलून नेले होते. पोलिसांनी त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्याची तसेच जेलमध्ये पाठवण्याची धमकी देऊन त्याच्या बायकोकडून पैसे उकळले. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता, एका हाताने अपंग असलेला सुदेश रिक्षाचालक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहीत मुलगी व लहान मुलगा असल्याच सुदेशची सासु सुशिलाबाई गोसावी यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई करा म्हणत फोडला टाहो...

शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मयत सुदेशच्या कुटुंबीयाची भेट घेतली. आत्महत्येचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबातील व्यक्तींचे, सहा आरोपींचे तसेच संबंधित पोलिसांचे जाबजबाब घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याच आश्वासन मयत सुदेशच्या कुटुंबियांना दिले आहे.

SPECIAL REPORT:सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!

First published: May 16, 2019, 10:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading